सोशल मीडियासाठी नवी नियमावली घोषित, जाणून घ्या फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि इंस्टाग्रामवर काय होणार परिणाम

सोशल मीडियाच्या नव्या नियमांची घोषणा, जाणून घ्या फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि इंस्टाग्रामवर काय होणार परिणाम (Announcing the new rules of social media, Know what the consequences will be)

सोशल मीडियासाठी नवी नियमावली घोषित, जाणून घ्या फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि इंस्टाग्रामवर काय होणार परिणाम
फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 1:20 PM

मुंबई : सोशल मीडियावर पारदर्शकता आणण्यासाठी, अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स काउंसिल आॅफ इंडियाने (एएससीआय) नव्या नियमांची घोषणा केली आहे. या परिषदेने डिजिटल मीडियावर एन्फ्लूएन्सर अ‍ॅडव्हर्टायजिंग म्हणजेच प्रभावशाली जाहिरातीसंबंधी दिशानिर्देश जारी केले आहेत. सध्याच्या घडीला एन्फ्लूएन्सर अ‍ॅडव्हर्टायजिंग वेगाने वाढत असल्याचे एएससीआयने म्हटले आहे. अलिकडच्या दिवसांत एन्फ्लूइन्सर्स पोस्टचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि अनेकदा त्यांची ओळख पटवणेही मुश्किल असते. नवीन नियमांनुसार क्रिएटिव्ह पोस्ट, व्हिडिओ किंवा लिखित कंटेंट एक जाहिरात आहे की नाही, हे सर्व एन्फ्लूएन्सरना स्पष्ट करावे लागेल. त्याचबरोबर जर प्रोडक्ट प्लेसमेंट असेल तर त्याविषयीही स्पष्टीकरणा देण्याची आवश्यकता आहे. (Announcing the new rules of social media, Know what the consequences will be)

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला नियम लागू

हा नियम युट्यूब, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ब्लॉग आणि अन्य व्हिडिओ प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लागू आहे. यापुढे सर्व प्रकारचे पेड कंटेंट, आॅनलाईन जाहिरातींना स्पष्टपणे हायलाईट केले पाहिजे, जेणेकरून व्ह्यूवरला कळले पाहिजे की, संबंधित स्पॉन्सर्ड कंटेंट आहे. नव्या नियमावलीनुसार, एन्फ्लूएन्सरना सर्वाधिक वेग, बेस्ट इन क्लास, दुप्पट चांगले यांसारखे दावे करणे टाळायला हवे़ किंवा अशा जाहिरातींसोबत ब्रँडच्या मालकाने स्पष्टीकरण दिलेले असले पाहिजे.

अंतिम मार्गदर्शक तत्त्वे 31 मार्चपर्यंत जारी केली जाणार

डिजिटल मीडियावर एन्फ्लूएन्सर अ‍ॅडव्हर्टायजिंगसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी 8 मार्च 2021 पर्यंत सर्व स्टेकहोल्डर्स आणि डिजिटल एन्फ्लूएन्सर्सकडून त्यांचे अभिप्राय मागवले जातील. त्यांच्या अभिप्रायच्या आधारे एएससीआय 31 मार्चपर्यंत अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम स्वरुप दिल्यानंतर 15 एप्रिल 2021 रोजी किंवा नंतर प्रकाशित केलेल्या सर्व प्रचार पोस्टवर नवीन नियमावली लागू होईल.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हिडिओवर व्ह्यूअर्सना सहज दिसेल, अशा पद्धतीने डिस्क्लोजर म्हणजेच प्रकटीकरण लेबल लावला पाहिजे. 15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या व्हिडिओंसाठी प्रकटीकरण लेबल कमीतकमी 2 सेकंद दिसला पाहिजे. 15 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 2 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या व्हिडीओंसाठी प्रकटीकरण लेबल असलेल्या व्हिडिओची लांबी एक-तृतीयांशपर्यंत असली पाहिजे. लाईव्ह स्ट्रीमसाठी प्रकटीकरण लेबल ठराविक काळाने अधूनमधून ठेवले पाहिजे.

एएससीआयने भिन्न प्लॅटफॉर्मसाठी एन्फ्लूएन्सरसाठी एक रेकनरसुद्धा जारी केला

इंस्टाग्राम : फोटोवर प्रकटीकरण लेबल शीर्षकाच्या सुरूवातीस समाविष्ट केले पाहिजे.

फेसबुक : सुरुवातीला किंवा पोस्टच्या शीर्षकात प्रकटीकरण लेबल समाविष्ट केले पाहिजे.

ट्विटर : संदेशाच्या मुख्य भागामध्ये टॅग म्हणून डिस्क्लोझर लेबल किंवा टॅग समाविष्ट करा.

यूट्यूब आणि अन्य व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी पोस्टच्या शीर्षकात / तपशीलात लेबल समाविष्ट करा.

व्हीलॉग : उत्पादन किंवा सेवांबद्दल बोलताना प्रकटीकरण लेबल आच्छादित (ओव्हरले) करा.

स्नॅपचॅट : संदेशाच्या सुरूवातीस प्रकटीकरण लेबल टॅग म्हणून समाविष्ट करा.

ब्लॉग : पोस्टच्या शीर्षकात प्रकटीकरण लेबल समाविष्ट करा. (Announcing the new rules of social media, Know what the consequences will be)

इतर बातम्या

जीमेलमध्ये प्रायव्हसी लेबलचा समावेश, जाणून घ्या किती डेटा कलेक्ट करते हे अॅप

जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.