अँटी बॅक्टेरियल स्मार्टफोन भारतात लाँच… जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
Infinix Smart 6 ची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे हा स्मार्टफोन 6 मेपासून फ्लिपकार्टवरून सेल केला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात हार्ट ऑफ ओसियन, लाइट सी ग्रीन, पॉलर ब्लॅक आणि स्टेरी पर्पल कलरमध्ये खरेदी करता येईल.
नवी दिल्लीः इनफिनिक्सने भारतात नवीन स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट 6 (Infinix Smart 6) लाँच केला आहे. इनफिनिक्स स्मार्ट 6 ची विक्री 6 मेपासून सुरू होणार आहे. दरम्यान, इनफिनिक्स स्मार्ट 6 ची एक खासियत म्हणजे त्याचा बॅक पॅनल हा पूर्णपणे अँटी-बॅक्टेरियल (Anti Bacterial) आहे. म्हणजेच त्यावर बॅक्टेरियाचा कुठलाही परिणाम होणार नाही. या फोनमध्ये 6.6 इंचाचा वॉटरड्रॉप सनलाइट डिसप्ले (Display) आहे. इनफिनिक्स स्मार्ट 6 मध्ये मिडियाटेक Helio A22 प्रोसेसर असून तो क्वाड कोर प्रोसेसर आहे.
किती आहे किंमत?
इनफिनिक्स स्मार्ट 6 ची किंमत 7,499 रुपये असून हा स्मार्टफोन 6 मेपासून फ्लिपकार्टवरून सेल केला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात हार्ट ऑफ ओसयन, लाइट सी ग्रीन, पोलर ब्लॅक आणि स्टेरी पर्पल कलरमध्ये खरेदी करता येईल.
ही आहेत स्पेसिफिकेशन्स
इनफिनिक्स स्मार्ट 6 मध्ये 6.6 इंचाचा HD Plus डिसप्ले आहे. फोनमध्ये मेडियाटेक Helio A22 प्रोसेसरसह अँड्रॉयड 11 (गो एडिशन) आधारित XOS 7.6 आहे. फोनसोबत 4 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज उपलब्ध असेल. 4GB रॅम मध्ये 2GB व्हर्च्युअल रॅमदेखील समाविष्ट आहे. फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध असेल. या बॅक पॅनलवर बॅक्टेरियाचा परिणाम होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
ड्युअल AI रियर कॅमेरा सेटअप
इनफिनिक्स स्मार्ट 6 मध्ये ड्युअल AI रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी लेंस 8 मेगापिक्सेल आहे. त्याच्यासोबत डबल एलईडी फ्लॅश आहे. कॅमेरा ऑटो-सीन डिटेक्शन व्यतिरिक्त AI HDR, ब्यूटी आणि पोर्ट्रेट मोडसह येतो. यात 5 मेगापिक्सेलचा AI सेल्फी कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरासह फ्लॅश लाईट देखील आहे. इनफिनिक्स स्मार्ट 6 DTS-HD सराउंड साउंडला सपोर्ट करतो. यात ब्लूटूथ v5.0 आहे. फोनसोबत 5000mAh बॅटरी आहे, ज्याचा 31 तासांचा बॅकअप असल्याचा दावा केला जात आहे.