AirPods आहेत की गुप्तहेर; शोधून काढली 5 कोटींची Ferrari कार, लयच जबरदस्त आहेत हे प्रोडक्ट

| Updated on: Oct 01, 2024 | 4:11 PM

Apple AirPods : ॲप्पल एअरपॉड्सच्या मदतीने एका व्यक्तीने त्याची 5 कोटी रुपयांची Ferrari Car शोधली. कारच्या मालकाने ॲप्पल एअरपॉड्समधील या फीचर्सच्या मदतीने त्याने ही कार शोधली आहे. ही कार चोरीला गेली होती. जणू हे एअरपॉड गुप्तहेरच झाला.

AirPods आहेत की गुप्तहेर; शोधून काढली 5 कोटींची Ferrari कार, लयच जबरदस्त आहेत हे प्रोडक्ट
अशी सापडली फेरारी कार
Follow us on

भारतातच नाही तर संपूर्ण देशात कार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पण एका व्यक्तीने Apple AirPods च्या मदतीने त्याची 5 कोटी रुपयांची Ferrari Car शोधून काढली आहे. Apple चे प्रोडक्ट कार मालकांसाठी एक वरदानच ठरलं आहे. कारच्या मालकाने ॲप्पल एअरपॉड्समधील या फीचर्सच्या मदतीने त्याने ही कार शोधली आहे. ही कार चोरीला गेली होती. जणू हे एअरपॉड गुप्तहेरच झाला, त्याच्या मदतीने मालकाने ही कार शोधून काढली.

Apple Find My Feature

ॲप्पलच्या फाईंड माय फीचरच्या मदतीने अनेक जणांनी त्यांचा iPhone, AirPods आणि इतर गॅझेट शोधून काढले असतील. पण पहिल्यांदा एका कार मालकाने AirPods च्या मदतीने एका व्यक्तीने 5 कोटी रुपयांची फरारी कार शोधून काढली आहे. मीडियातून ही बातमी समोर आली आहे. पण त्यात फेरारी कारचे मॉडेल कोणते होते, हे समोर आलेले नाही.

हे सुद्धा वाचा

Ferrari कारमध्ये विसरला बड्स

इंग्लंडमधील लंडन येथून हा प्रकार समोर आला आहे. ग्रीनविच येथील एका व्यक्तीने त्याची ब्रँड न्यू फेरारी कार वाहतळावर लावली. त्यावेळी तो AirPods कारमध्येच विसरला. पण ही चूक त्याच्यासाठी वरदान ठरली. या व्यक्तीला चोरीला गेलेली कार सहज शोधता आली. ही व्यक्ती परत आल्यावर त्याची कार काही सापडली नाही. पण त्याच्या AirPods कडून सिग्नल मिळत होते. त्यामुळे व्यक्तीने थेट पोलिसांमध्ये धाव घेतली. फाईंड माय फीचरचा वापर करून ही कार लागलीच शोधता आली. व्यक्तीने या फीचरबद्दल ॲप्पल कंपनीला धन्यवाद दिले.

यापूर्वी पण ॲप्पलच्या खास तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेल्य वस्तू शोधण्यात यश आले आहे. यापूर्वी अशा अनेक कथा समोर आल्या आहेत. ॲप्पलच्या काही उत्पादनांनी ग्राहकांचे प्राण वाचवण्यात पण मदत केल्याचा दावा करण्यात येत आहे.

कशी काम करते Find My हे तंत्रज्ञान?

Apple चे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी Find My हे फीचर मिळते. हे फीचर अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या फीचरच्या मदतीने हरवलेले डिव्हाईस शोधून काढता येते. Apple च्या फाईंड माय या ॲपचा वापर करून तुम्ही आयफोन वा इतर डिव्हाईस शोधून काढू शकता. जर डिव्हाईस ऑन असेल तर हे फीचर एक आवाज सतत वाजवते.