iPhone 15 सीरिज लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स
Apple iPhone 15 Series Price in India: गेल्या काही दिवसांपासून आयफोन 15 सीरिजची असलेली प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने आयफोन 15 चे चार मॉडेल लाँच केले आहेत. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Plus यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात किंमत आणि इतर फीचर्स
मुंबई : आयफोन चाहत्यांची गेल्या काही दिवसांपासून असलेली प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने ठरल्याप्रमाणे आयफोन 15 सीरिज लाँच केली आहे. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Plus मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीने यंदा नव्या आयफोन सीरिजमध्ये मिनी मॉडेल लाँच केलं नाही, हे विशेष. आयफोन सीरिजमध्ये नॉचच्या जागेवर डायनॅमिक फीचर दिलं गेलं आहे. आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रो मॉडेल 6.1 इंचाच असेल. तर आयफोन प्लस आणि आयफोन प्रो प्लस मॉडेल 6.7 इंचाचा असणार आहे. या हँडसेटचा पुढची बाजूही आकर्षक केली गेली आहे. प्रो मॉडेलमध्ये टायटेनियम फ्रेम दिली गेली आहे. हा आयफोन 22 सप्टेंबरपासून ग्राहकांच्या हाती पडेल असं बोललं जात आहे.
आयफोन 15 सीरिजचा कॅमेरा आणि फीचर्स
आयफोन 15 मध्ये ठरल्याप्रमाणे युएसबी टाईप सी चार्ज दिला आहे. या माध्यमातून फोन चार्ज करता येणार आहे. युनिवर्सल चार्जर असावा यासाठी युरोपियन युनियनमध्ये एक प्रस्ताव पारीत करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीला या प्रस्तावापुढे झुकावं लागलं आहे. कंपनीने पहिल्यांदाच सी पोर्ट चार्जर आणला आहे.आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस मध्ये ए16 बायोनिक चिपसेट दिली आहे. तर वायर्ड आणि वायरलेस कनेक्टिविटी पर्याय असेल. या व्यतिरिक्त आयफोन प्रो आणि आयफोन प्रो प्लसमध्ये ए17 बायोनिक प्रोसेसर असेल. आयफोन 15 मध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. या माध्यमातून युजर्संना चांगल्या फोटोग्राफीची अनुभूती मिळणार आहे. आयफोन 15 प्रोमध्ये युजर्संना 3डी व्हिडीओ रेकॉर्डिंगचा पर्याय असणार आहे.
आयफोन 15 सीरिजची किंमत
आयफोन 15 च्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 799 डॉलर्स म्हणजेच जवळपास 66,213 रुपये इतकी असेल. आयफोन 15 प्लस 128 जीबी मॉडेलची किंमत 899 डॉलर म्हणजेच जवळपास 74,500 रुपये असेल. आयफोन प्रो फोनची किंमत 999 डॉलर्सपासून सुरु होईल. तसेच प्रो मॅक्सची किंमत 1199 डॉलर्सपासून होईल. या दोन्ही किमती 256 जीबी व्हेरियंटच्या आहेत. हे सर्व मॉडेल 15 सप्टेंबरपासून बुक करता येतील.
आयवॉच सीरिज 9
Apple Watch Series 9 ची बॅटरी लाईफ जबरदस्त आहे. आयवॉच पाच रंगात उपलब्ध असेल.आयवॉच वापरणं देखील आणखी सोपं होणार आहे. आयवॉचच्या माध्यमातून आयफोन सहज शोधू शकाल. याची खासियत म्हणजे नुसत्या दोन चुटक्या वाजवल्या की फोन उचलला जाणार आहे. एस 9 सिस्टमसह नव्या आयवॉचचं लाँचिंग करण्यात आलं आहे. आता तुम्ही आयवॉचच्या माध्यमातून Siri कडून तुमचा आरोग्य डेटा मागू शकाल. हे फीचर सुरुवातीला इंग्रजी आणि मँडरीनमध्ये उपलब्ध असेल.