Apple iPhone 15 : आयफोन 15 सीरिजचं आज लाँचिंग, सर्व अपडेट जाणून घ्या
Apple iPhone 15 event: आयफोन 15 सीरिज अवघ्या काही तासात लाँच होणार आहे. या फोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काय असेल खासियत ते जाणून घेऊयात
मुंबई : आयफोन प्रेमींसाठी आज आनंदाचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली प्रतीक्षा आज संपणार आहे. अवघ्या काही तासात आयफोन 15 सीरिज लाँच होणार आहे. या फोनमध्ये काय नवं असेल? चार्जिंग पोर्टबाबत गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या बातम्या खऱ्या ठरतील का? या सर्व प्रश्नांची उत्तर आज मिळतील. आयफोन 15 आणि दोन स्मार्टवॉचची भेट मिळणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Apple iPhone 15 event: आज पाच हँडसेट लाँच होऊ शकतात
आयफोन 15 सीरिजमधील पाच हँडसेट लाँच होतील, असं सांगण्यात येत आहे. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि iPhone Pro Max Ultra लाँच होऊ शकतात.
-
Apple iPhone 15 event: आज आयफोन 15 सीरिज लाँच होणार
Apple आज रात्री 10.30 वाजता नवी आयफोन 15 सीरिज लाँच करणार आहे. या फोनबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्सुकता आहे.
-
Published On - Sep 12,2023 9:48 AM
Most Read Stories