फ्लिपकार्टवर आयफोन 13 वर मोठी डिस्काउंट मिळत आहे.जर तुमचं बजेट आयफोन 14 घेण्याचं नसेल तर तुम्ही आयफोन 13 फक्त 38,999 रुपयांना घेऊ शकता. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ही ऑफर देण्यात आली आहे. (Photo- APPLE)
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन 13 चा 128 जीबी व्हेरियंट 59,999 रुपयांना विकला जात आहे. (Photo- APPLE)
फ्लिपकार्टने मॉडलसोबत काही ऑफर्स शेअर केल्या आहेत. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडीट कार्डवरून ईएमआय ट्रान्सक्शनवर 10 टक्के सूट मिळते. बँकेच्या डिस्काउंटनंतर हा फोन 58,999 रुपयांना मिळतो. (Photo- APPLE)
डिव्हाईस विकत घेताना तुम्हाला 20 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंज किंमत पूर्ण मिळाल्यांनंतर या फोनची किंमत 38,999 रुपये इतकी होते. (फोटो - फ्लिपकार्ट)
आयफोन 13 मध्ये ए15 बायोनिक चिपसेटसह 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. मागे 12 एमपीचे दोन कॅमेरा सेटअप आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12 एमपीचा कॅमेरा पुढे आहे. (Photo- APPLE)