Apple चं Xiaomi, OnePlus पावलावर पाऊल, iPhone 13 मध्ये ‘हे’ फीचर्स मिळणार

बहुप्रतीक्षित Apple iPhone 13 यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. (iPhone 13 could be launched in September 2021)

Apple चं Xiaomi, OnePlus पावलावर पाऊल, iPhone 13 मध्ये 'हे' फीचर्स मिळणार
iphone
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 8:22 AM

मुंबई : बहुप्रतीक्षित Apple iPhone 13 यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. फोनची लाँचिंग डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसे या फोनची स्पेसिफिकेशन्सही लीक होत आहेत. नुकतीच iPhone 13 Pro series च्या डिस्प्लेबाबतची काही माहिती लीक झाली आहे. तसेच काही स्पेसिफिकेशनही समोर आले आहेत. (Apple iphone 13 will have few same features as Xiaomi mMi 11 Ultra and Oneplus 9 pro, check details)

Apple आता शाओमी एमआय 11 अल्ट्रा (Xiaomi Mi 11 Ultra) आणि वनप्लस 9 प्रो (OnePlus 9 Pro) या अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. कंपनी iPhone 13 Series 12Hz ProMotion डिस्प्लेसोबत लाँच करु शकते. MacRumors ने DigiTimes च्या रिपोर्टचा हवाला देत म्हटले आहे की, अॅपल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max साठी LTPO (लो-टेम्परेचर पॉलिक्रिस्टलाइन ऑक्साइड) डिस्प्लेचा वापर केला जाणार आहे. सॅमसंग आणि एलजी डिस्प्ले LTPO OLED पॅनलचे प्रमुख सप्लायर्स आहेत. दुसऱ्या बाजूला vanilla iPhone 13 आणि iPhone 13 mini स्मार्टफोन 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह लाँच केले जाऊ शकतात.

iPhone 13 ची एक इमेज समोर आली आहे. iPhone 13 चा डिस्प्ले नॉच पूर्वीपेक्षा लहान असेल. असंच डिझाईन iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या सर्वच स्मार्टफोन्समध्ये दिलं जाणार आहे. iPhone 13 आणि iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचांचा डिस्प्ले दिला जाईल. तर iPhone 13 Pro Max मध्ये 6.7 इंचांची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच iPhone 13 mini स्मार्टफोन iPhone 12 mini प्रमाणे 5.4 इंचांच्या डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोन्सबद्दलच्या अहवालानुसार, आयफोन 13 प्रो चा नॉच 5.35 मिमी लांबीसह दिला जाऊ शकतो, तर आयफोन 12 प्रोमध्ये हा नॉच 5.30 मिमी लांबीसह आहे. दुसरीकडे, आपण जर या फोनच्या रुंदीबद्दल बोलायचे झाल्यास या नवीन आयफोनची रुंदी 26.8 मिमी इतकी असेल, तर आधीच्या आयफोन 12 प्रोची रुंदी 34.83 मिमी इतकी होती.

आयफोनमध्ये पंचहोल डिझाईन मिळणार

आयफोन एक्स मध्ये नॉच सादर केल्यानंतर, आयफोनचा नॉच थोडा लहान केला जाणार आहे. नॉच लहान करण्यासाठी कंपनीने ईयरपीस टॉप बेजेल वरच्या बाजूला सरकवलं आहे. असं म्हटलं जातंय की, अॅपल कंपनी 2022 मध्ये काही ठराविक iPhone मॉडेल्समध्ये पंच होल डिझाईन देऊ शकते. जो Samsung Galaxy S21 Ultra प्रमाणे असेल. तसेच फेस आयडीऐवजी कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. कंपनी iPhone 13 सिरीज फास्टर A15 चिप, इम्प्रूव्ह्ड कॅमेरा आणि मॅट ब्लॅकसह नवीन रंगांमध्ये सादर करु शकते.

संबंधित बातम्या

Flipkart Mobile Bonanza Sale : Asus ROG Phone 3 वर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

Mobile Bonanza Sale : ‘या’ 10 स्मार्टफोन्सवर तब्बल 8000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

(Apple iphone 13 will have few same features as Xiaomi mMi 11 Ultra and Oneplus 9 pro, check details)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.