Apple iPhone 15 Update : आयफोन 15 च्या नवीन रंगाची नवलाई! या Colour मध्ये मिळेल स्मार्टफोन

Apple iPhone 15 Update : ॲप्पलचा आयफोन 15 ची आणखी एक नवलाई समोर आली आहे. आता हा स्मार्टफोन आणखी नवीन रंगात समोर येणार आहे. लाँचिंगपासून आयफोनवर चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. पण त्यांचा रंगांची निवड करण्याचा पर्याय मर्यादीत आहे. आता त्यात आणखी काही रंगाच्या मॉडेलची भर पडणार आहे.

Apple iPhone 15 Update : आयफोन 15 च्या नवीन रंगाची नवलाई! या Colour मध्ये मिळेल स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 2:09 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : भारतासह जगाच्या बाजारात देशात तयार झालेल्या आयफोन15 ने धडक दिली. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन देशात तयार झाला आहे आणि त्यातील नॅव्हिगेशन सिस्टीम इस्रोने तयार केलेली आहे. 12 सप्टेंबर रोजी आयफोन (iPhone 15) देशात लाँच झाला. आयफोन15 आणि आयफोन 15 प्लस पारंपारिक पद्धतीने आहे त्याच रंगात (Available Colour) उपलब्ध आहेत. यामध्ये काळा, हिरवा, पिवळा, गुलाबी आणि निळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. आयफोन 15 सध्या याच रंगात जगाच्या बाजारात उपलब्ध आहे. पण यामध्ये अजून एका रंगाची भर पडणार आहे. त्यामुळे ज्यांना भडक रंग आवडतो, अशा चाहत्यांना ही खास मेजवाणी असेल. तर मग कोणत्या रंगात येणार आहे, तुमचा लाडका आयफोन 15?

iPhone 15 आणि15 Plus चे सध्याचे रंग

  • काळा
  • हिरवा
  • पिवळा
  • गुलाबी
  • निळा

iPhone 15 Pro आणि Pro Max चा रंग कोणता

हे सुद्धा वाचा
  • निळा टायटॅनियम
  • नॅचरल टायटॅनियम
  • काळा टायटॅनियम
  • पांढरा टायटॅनियम

कोणत्या रंगात येणार आयफोन15

आता आयफोन 15 च्या नवीन रंगाची चर्चा रंगली आहे. अनेक जण त्यासाठी उत्सुक आहेत. तरुणाईला आवडेल असे खास रंगांची निवड आतापर्यंत ॲप्पलने केली आहे. तरीही अनेकांना या रंगात ही नवलाई हवी आहे. काहींना भडक, चित्ताकर्षक, चटकन डोळ्यात भरणाऱ्या रंगाची आवड असते. हीच आवड लक्षात घेऊन आयफोन 15 आता लाल रंगात येऊ घातला आहे.

पण थोडी वाट पाहा

या नवीन रंगातील आयफोन 15 साठी चाहत्यांना मात्र थोडी कळ सोसावी लागणार आहे. हा आयफोन लागलीच बाजारात येणार नाही. त्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. पुढील वर्षी लाल रंगातील आयफोन 15 बाजारात धुमाकूळ घालणार आहे. ॲप्पल 2017 पासून आयफोनचे एक तरी मॉडेल लाल रंगात घेऊन आला आहे. या रंगाला पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे. iPhone 15 आणि15 Plus हे दोन फोन मार्चे ते एप्रिल 2024 पर्यंत लाल रंगात येण्याची शक्यता आहे.

का होतोय गरम

मॉडेलमध्ये करण्यात आलेले अंतर्गत बदलामुळे आयफोन गरम होत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. डिझाईनमधील बदल त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. ॲप्पलने थर्मल डिझाईनचा वापर केल्याने हँडसेट गरम होत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचे चटके सहन करावे लागत आहे. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.