‘Apple iPhone 12’ ची लाँचिंग तारीख ठरली, पाहा फिचर आणि किंमत

अॅपल मोस्ट अवेटेड सीरिज आयफोन 12 (Apple iPhone 12) ला 13 ऑक्टोबरला लाँच करत आहे (Iphone mini phone launch).

'Apple iPhone 12' ची लाँचिंग तारीख ठरली, पाहा फिचर आणि किंमत
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 4:59 PM

मुंबई : अॅपल मोस्ट अवेटेड सीरिज आयफोन 12 (Apple iPhone 12) स्माक्टफोन उद्या (13 ऑक्टोबर) लाँच करत आहे (Iphone mini phone launch). आयफोन यावर्षात आयफोन 12 सीरिजचो चार नवीन आयफोन लाँच करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये दोन प्रीमिअम व्हेरिअंटचा समावेश असू शकतो. आयफोन 12 ची लाँचिंग अॅपलच्या कार्यक्रमादरम्यान केली जाणार आहे. या कार्यक्रमाची लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर दाखवू शकतात (Iphone mini phone launch).

आयफोन 12 च्या 5.4 व्हेरिअंटची किंमत 649 डॉलर म्हणजेच 47 हजार 772 रुपयापासून सुरु होतक आहे. तर 6.1 इंचाच्या आयफोन 12 ची किंमत 749 डॉलर म्हणजेच 55 हजार 134 रुपये आहे. 5.4 आणि 6.1 इंचाच्या आयफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी दिली आहे. त्यासोबत फोनच्या रिअल पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये फक्त स्क्रीन साईजचा फरक आहे. दोन्ही फोनमध्ये OLED डिस्प्ले सपोर्ट आहे.

अॅपलचा सर्वात छोटा फोन आयफोन 12

आयफोनचा 5.4 इंचाचा डिस्प्लेचा फोन हा सर्वात छोटा फोन आहे आणि आयफोनने याला आयफोन 12 मिनी असं नाव दिलं आहे. आयफोन 12 च्या सर्वात छोट्या आकाराच्या फोनचा फोटो समोर आला आहे. त्यानुसार त्याला आयफोनने मिनी असं नाव दिले आहे आणि त्याशिवाय 6.7 इंचाच्या फोनला आयफोन 12 प्रो मॅक्स, तर 6.1 इंचाच्या फोनला आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो नाव दिले आहे.

आयफोन पहिल्यांदाच आपल्या फोनसोबत मिनी या शब्दाचा वापर करत आहे. यापूर्वी अॅपलने आयपॅड मिनी आणि आयपॉड मिनी लाँच केला होता. आयफोन 12 मिनी आकारामध्ये आयफोन 11 प्रो पेक्षा छोटा आहे.

12 MP चा प्रायमरी कॅमेरा

आयफोन 12 ला घेऊन दोन अफवा समोर आल्या आहेत. ज्यामध्ये आयफोन 12 प्रो मध्ये 64 मेगापिक्सल सेंसर आणि 5x ऑप्टिकल झूम फीचर दिला आहे आणि पुढच्या वर्षी आयफोन 13 मध्ये 64 च्या ऐवजी 48MP कॅमेरा मिळू शकतो. या अशा दोन अफवा पसरल्या होत्या.

iPhone 12 आणि iPhone 12 Max ला प्रायमरी कॅमेरामध्ये 12MP सेंसर दिले आहेत. त्यासोबत फ्रंट कॅमेरा 12MP आहे. याशिवाय iPhone 12 प्रो आणि iPhone 12 प्रो मॅक्स मॉडलला 12 मेगापिक्सल सेंसर दिला आहे.

संबंधित बातम्या : 

बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री

अमेरिकी कंपनीचा नवा स्मार्टफोन लाँच, चार वर्षांची वॉरंटी, पाहा फीचर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.