ॲपलचा सर्वात स्वस्त iPhone या वर्षी होणार लाँच , मिळतील हे फीचर्स

तुम्ही ॲपल कंपनीच्या आयफोनचे फॅन असाल तर तुम्हाला हा फोन खूप आवडू शकतो. यावर्षी कंपनी आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत फोन लाँच करू शकते. कोणती सिरीज असेल आणि त्यात काय खास असेल. आगामी आयफोनबद्दल सर्व तपशील जाणून घ्या.

ॲपलचा सर्वात स्वस्त iPhone या वर्षी होणार लाँच , मिळतील हे फीचर्स
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 3:58 PM

तुम्ही जर आयफोनचे चाहते असाल तर तुम्हाला सर्वात कमी किमतीत असलेला हा आयफोन लवकरच खरेदी करता येणार आहे. ॲपलचा चौथ्या जनरेशनचा iPhone SE या वर्षी अधिकृतपणे लाँच केला जाऊ शकतो. दरम्यान भारतीय बाजारपेठेत iPhone SE 4 बद्दल अनेक अफवा समोर येत आहेत. आता या फोनच्या फीचर्सबद्दलही काही डिटेल्स समोर आले आहेत. सर्वात कमी किंमतीत लाँच होणारा हा ॲपलचा पहिला स्मार्टफोन ठरू शकतो. आयफोन एसई 4 मध्ये काय वैशिष्ट्ये असतील? कॅमेरा कसा असेल आणि नवीन कोणते फीचर्स दिसेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

iPhone SE 4 मधील फीचर्स

ॲपलच्या आगामी आयफोनमध्ये फोटो-व्हिडिओग्राफीसाठी तुम्हाला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. या फोनला iPhone 16e असेही म्हटले जाण्याची शक्यता आहे. हे iPhone 16 चे स्वस्त व्हर्जन देखील असू शकते.

टिप्सटरच्या मते, iPhone SE 4/ ​​iPhone 16e लवकरच बाजारात येऊ शकतो. याचा डिस्प्ले साइज ६.०६ इंच असू शकतो. हा फुल एचडी+ LTPS OLED डिस्प्ले असेल. ज्याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्झ असू शकतो. स्मार्टफोनमध्ये फेस आयडी सपोर्ट असू शकतो. iPhone 16 प्रमाणेच Apple चा A18 बायोनिक चिपसेटने सुसज्ज असू शकतो. कदाचित या फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा मिळेल.

आगामी आयफोनची अपेक्षित किंमत

पुढील पिढीचा iPhone SE या महिन्याच्या अखेरीस iPad 11 आणि iOS 18.3 आणि iPadOS 18.3 सॉफ्टवेअर अपडेटसह लाँच होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी मात्र ही अफवा खोटी असल्याचे सिद्ध केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा फोन एप्रिलच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो. या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत 500 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 42,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

लक्षात ठेवा की, ॲपलकडून या आगामी फोनच्या लाँचिंगबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि टिप्सटरनुसार हा फोन या वर्षी बाजारात लाँच केला जाऊ शकतो.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...