Technology | ‘आयफोन 12 मिनी’ ठरेल Appleचा सगळ्यात लहान स्मार्टफोन!

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Apple पुढच्या महिन्यात आपल्या चार नव्या फोनसहित ‘आयफोन 12’ ही नवी सिरीज (Iphone12 series) लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Technology | ‘आयफोन 12 मिनी’ ठरेल Appleचा सगळ्यात लहान स्मार्टफोन!
Android Police च्या एका रिपोर्टनुसार Android 7.1.1 Nougat च्या आधीच्या सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सिक्युअर वेबसाईट्स उघडणार नाहीत. विशेष म्हणजे सध्या अनेक वेबसाईट या सिक्युअर वेबसाईट्स असल्याने त्या या मोबाईल न उघडणे म्हणजे त्या मोबाईलचा कोणताही उपयोग न होण्यासारखंच आहे.
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 2:19 PM

मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Apple पुढच्या महिन्यात आपल्या चार नव्या फोनसहित ‘आयफोन 12’ ही नवी सिरीज (Iphone12 series) लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चार नवीन मॉडेल्सपैकी 5.4 इंच डिस्प्ले असणारा ‘आयफोन 12 मिनी’ (Iphone12 Mini) हा Appleचा सगळ्यात लहान स्मार्टफोन असणार आहे. आयफोन 12च्या सिरीजमधील स्मार्ट फोनचे फोटो प्रसिद्ध झाले असून, यातील सगळ्यात लहान आकाराच्या फोनला ‘मिनी’ (Mini) म्हटले गेले आहे (Apple Launching Iphone12 series with Iphone12 Mini).

आयफोन 12च्या सिरीजमध्ये 6.7 इंचाच्या स्मार्टफोनला ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’ असे नाव देण्यात आले आहे. तर, 6.1 इंच डिस्प्ले असणारे दोन स्मार्ट फोन ‘आयफोन 12’ आणि ‘आयफोन 12 प्रो’ या नावाने ओळखले जाणार आहेत. या चारही स्मार्टफोन्समध्ये 5जी कनेक्टीव्हीटी दिली गेली आहे. या व्यतिरिक्त ‘आयफोन 12’ सिरीजच्या चारही फोन्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

स्मार्टफोनला ‘मिनी’ म्हणण्याची ही पहिलीच वेळ

Appleने आतापर्यंत कुठल्याही स्मार्टफोनच्या सिरीजमध्ये ‘मिनी’ (Mini) असा शब्द वापरला नव्हता. Apple स्मार्टफोनला ‘मिनी’ म्हणण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या आधी Appleने ‘आयपॅड मिनी’ आणि ‘आयपॉड मिनी’ लाँच केले होते. ‘आयफोन 12 मिनी’ (Iphone12) आकाराने ‘आयफोन 11 प्रो’पेक्षा लहान असणार आहे. आयफोन 11 प्रोला 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला होता (Apple Launching Iphone12 series with Iphone12 Mini).

लो-लाईट कॅमेरा

‘आयफोन 12 मिनी’ आणि ‘आयफोन 12’मध्ये 12 मेगापिक्सेल सेन्सरचा कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, ‘आयफोन 12 प्रो’ आणि ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’मध्येही  12 मेगापिक्सेल सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, या कॅमेरा सेन्सरमुळे कमी प्रकाशातही उत्तम फोटो काढता येणार आहेत.

काय असेल किंमत?

मार्केट रिपोर्ट्सनुसार, 5जी कनेक्टीव्हीटी फिचर असणाऱ्या या नव्या स्मार्टफोनची (Iphone12 Series) किंमत मागच्या वर्षी लाँच झालेल्या फोनच्या तुलनेत काहीशी अधिक असणार आहे. कारण यावर्षी आयफोनच्या मटेरियल कॉस्टमध्ये 50 डॉलर्सने वाढ झाली आहे. गिज्मो चायनाच्या अहवालानुसार, किंमत काहीप्रमाणात कमी व्हावी याकरिता कंपनी बॉक्समध्ये चार्जर आणि वायर इयरफोन्स देणार नसल्याचे कळते आहे. यामुळे आता Appleकंपनी 20 वॅट क्षमतेचा चार्जर स्वतंत्रपणे विकू शकणार आहे.

Appleचे विश्लेषक जॉन प्रॉसर यांच्या दाव्यानुसार, Appleचा 5.4 इंच डिस्प्ले असणारा ‘आयफोन 12 मिनी’ची किंमत 649 डॉलर म्हणजेच साधारण 47,773 रुपयांत बाजारात आणला जाऊ शकतो. तर, 6.1 इंच डिस्प्लेचे इतर फोन 749 डॉलर म्हणजेच जवळपास 55,134 रुपयांना विकले जाऊ शकतात.

(Apple Launching Iphone12 series with Iphone12 Mini)

‘रेडमी नोट 7’ बंद होणार, कारण…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.