Apple MagSafe Charger : Apple ने आणला एक नवीन ‘बॅटरी पॅक’, वायरलेस पद्धतीने, डिवाइस होईल काही मिनीटांतच चार्ज
Apple ने MagSafe बॅटरी पॅकला नवीन फर्मवेअर अपडेट दिले आहे. Apple ने त्याच्या सपोर्ट पेजवर Magfair साठी फर्मवेअर अपडेटची घोषणा केली आहे. मॅगफेअर बॅटरी पॅक अपडेट केल्याने Apple च्या सर्व डिव्हाइसेसना अधिक वेगाने चार्ज करता येईल. युजर्स ऍपल उपकरणाशी बॅटरी पॅक कनेक्ट करून फर्मवेअर अपडेट करू शकतील
मुंबई : Apple ने त्यांच्या MagSafe बॅटरी पॅकशी संबंधित एक मोठे अपडेट (rough update)आणले आहे. कंपनीने MagSafe बॅटरी पॅकसाठी नवीन फर्मवेअर (new firmware) अपडेट जारी केले आहे. नवीन अपडेटच्या मदतीने, MagSafe युजर्स सपोर्टेड पल डिव्हाइसेस त्वरीत चार्ज करता येतील. ते अपडेट केल्यानंतर, युजर्स 7.5W वर सपोरर्टेड iPhone वायरलेस पद्धतीने चार्ज करू शकतील. आत्तापर्यंत आयफोनला मॅगसेफ बॅटरी पॅकसह 5W वर वायरलेस चार्जिंग करता येत होती. याशिवाय, मॅगसेफ बॅटरी पॅक 20W चार्जरशी कनेक्ट केल्यावर आपन, फोन 15W वर चार्ज करू शकतो. परंतु, आता या नवीन ऍपलचे डिव्हाइस मॅगसेफ बॅटरी पॅकच्या (magsafe battery pack) मदतीने स्मार्टफोन काही मिनीटांतच चार्ज करता येईल.
मॅगसेफ कसे अपडेट करायचे
ऍपलने मॅगसेफ गॅझेट कसे अपडेट करावे हे युजर्संना सांगण्यासाठी त्याच्या सपोर्ट पेजवर देखील अपड़ेट्स केल्या आहेत. या पेजवर, सर्व स्टेप्स सांगितले असून, ज्याद्वारे युजर्स त्यांचा बॅटरी पॅक अपडेट करू शकतात. युजर्स आयफोन, आयपॅड किंवा मॅकच्या मदतीने हे फर्मवेअर अपडेट करू शकतात. आयपॅड किंवा मॅकशी बॅटरी पॅक कनेक्ट केल्याने गॅझेटवरील फर्मवेअर सुमारे 5 मिनिटांत आपोआप अपडेट होईल. त्याच वेळी, आयफोनशी कनेक्ट केल्यावर फर्मवेअर अपडेटसाठी एक आठवडा लागू शकतो.
IOS 14.7 किंवा त्यावरील स्मार्टफोनवर होईल अपडेट
Apple च्या MagSafe बॅटरी पॅकसाठी नवीन फर्मवेअर वर्जन 2.7 आहे. युजर्स त्यांच्या MagSafe बॅटरी पॅकची नवीन अपडेट अगदी सहजपणे जाणून घेऊ शकतात. हे जाणून घेण्यासाठी युजर्संना त्यांचा आयफोन मॅगसेफशी जोडावा लागेल. कनेक्ट केल्यानंतर, युजर्स iPhone मधील Settings/ General/ About/ MagSafe Battery Pack वर जाऊन त्यांचे वर्जन तपासू शकतात. कृपया लक्षात ठेवा की MagSafe फक्त iOS 14.7 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्या iPhones चे मध्येच चालेल.
फ्लॅश लाइट चार्ज झाला आहे की नाही तेही सांगेल
युजर्स एकाच वेळी आयफोन आणि मॅगसेफ बॅटरी पॅक दोन्ही चार्ज करू शकतात. दोन्ही उपकरणे एकाच वेळी चार्ज करण्यासाठी, मॅगसेफ बॅटरी पॅक पॉवर अॅडॉप्टरमध्ये प्लग इन करणे आवश्यक आहे आणि नंतर बॅटरी पॅक आयफोनशी कनेक्ट करणे आवश्यक आहे. MagSafe बॅटरी पॅक चार्ज केल्यावर स्टेटस लाइट चमकतो. जेव्हा ते हिरवे असते, तेव्हा तुमचा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज होतो. तर, जर ते एम्बर असेल, तर तुमचा बॅटरी पॅक चार्ज व्हायचा आहे असे समजावे.
MagSafe कडून मिळेल अतिरीक्त पॉवर
MagSafe बॅटरी पॅक iPhone 12 सीरीज आणि iPhone 13 सीरीज वेरीएंटला सपोर्ट देते. हे डीवाइस आयफोनला 1460mAh चा अतिरिक्त पॉवर सपोर्ट देते. हा बॅटरी पॅक ऍपलच्या सपोर्टेड डीवाइसच्या मागील बाजूस मॅगनेटपद्धीतीने जोडला जातो. त्याच्या मदतीने, ऍपल डिव्हाइस चार्ज केले जाते. MagSafe बॅटरी पॅक भारतात Rs.10,900 मध्ये उपलब्ध आहे.
इतर बातम्या :