iPhone ने नादच केला, ‘इनॅक्टिव्हिटी रिबूट’ फीचरमुळे पोलिसांनाही फुटेल घाम

Apple iPhone Privacy Features: अ‍ॅपलच्या नव्या 'इनॅक्टिव्हिटी रिबूट' फीचरमुळे हॅकर्स नव्हे तर पोलिसांनाही घाम फुटू शकतो. कारण, आता आयफोन अनलॉक करणे जवळपास अशक्यच झाले आहे. 'इनॅक्टिव्हिटी रिबूट' फीचरमुळे हॅकर्स नव्हे तर तपासासाठी पोलिस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना फोन अनलॉक करणे आणखी कठीण होणार आहे. नव्या अपडेटनंतर आयफोनचे लॉक तोडणे म्हणजेच अनलॉक करणे जवळपास अशक्यच झाले आहे. -

iPhone ने नादच केला, 'इनॅक्टिव्हिटी रिबूट' फीचरमुळे पोलिसांनाही फुटेल घाम
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 2:46 PM

‘बस नाम ही काफी हैं’ असं आपण Apple कंपनीला सुरक्षेच्या बाबतीत म्हणून शकतो. कारण, Apple ची प्रायव्हसी आणि सुरक्षितता दमदार आहे. आता यातच Apple ने पुन्हा युजर्सच्या सुरक्षेच्याबाबबीत एक मोठी झेप घेतली आहे. Apple कंपनीने आयफोनमध्ये ‘इनॅक्टिव्हिटी रिबूट’ फीचर आणले आहे. Apple चे ‘इनॅक्टिव्हिटी रिबूट’ फीचरमुळे हॅकर्स आणि अगदी पोलिस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना फोन अनलॉक करणे अशक्य आहे. नव्या अपडेटनंतर आयफोनचे लॉक तोडणे सोपे राहिलेले नाही.

तुम्हाला माहिती आहे की, iOS 18.1 अपडेटनंतर आयफोन आणखी अपडेट झाला आहे. या iOS 18.1 अपडेटनंतर आता तुमचा आयफोन काही दिवस अनलॉक झाला तर तो आपोआप रिबूट होईल. समजायला थोडे कठीण आहे पण आम्ही तुम्हाला सोपे करून सांगत आहोत.

आयफोनची प्रायव्हसी मजबूत

तुम्हाला माहिती आहे की, आयफोन आधीपासूनच मजबूत प्रायव्हसी आणि सिक्युरिटी फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यात आता नव्या अपडेटनंतर Apple कंपनीने आता आयफोनची प्रायव्हसी आणखी मजबूत केली आहे. आता नव्या अपडेटमुळे एक अ‍ॅक्टिव्हिटी टाईमर काम करत आहे. हा टाईमर विशिष्ट काळानंतर AFU स्थितीत डिव्हाईसला BFU स्थितीत रिबूट करतो. आता AFU आणि BFU म्हणजे काय हे खाली जाणून घ्या.

हे सुद्धा वाचा

AFU आणि BFU म्हणजे काय?

AFU याला After First Unlock असं म्हणतात. म्हणजेच फोन एकदा अनलॉक झाला आहे. फर्स्ट अनलॉक ( BFU ) होण्याआधी जेव्हा फोन एकदाही अनलॉक झालेला नसतो आणि या टप्प्यावर आयफोनमध्ये प्रवेश करणे खूप कठीण असते.

तपास यंत्रणा आणि अ‍ॅपल यांच्यात वाद का?

आयफोनमधील निष्क्रिय रिबूट फीचर अशा वेळी आले आहे जेव्हा सरकारी तपास संस्था किंवा अधिकारी आणि स्मार्टफोन कंपन्यांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांना त्यांच्या तपासात मदत करण्यासाठी जप्त केलेल्या डिव्हाईसमधून डेटा काढायचा असतो. त्याचबरोबर अ‍ॅपलसारखे स्मार्टफोन ब्रँड्स इतर कंपन्यांपेक्षा वेगळे राहण्यासाठी लोकांच्या प्रायव्हसीचे पुरस्कर्ते म्हणून स्वत:ला सादर करतात. यामुळे हा वाद वाढतो.

अ‍ॅपलचे सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल

अ‍ॅपलचे हे पाऊल सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे, असं म्हणता येईल. यावरून कंपनी युजर प्रायव्हसोबत किती गांभीर्याने घेते हे दिसून येते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.