Apple चा भारतात डंका! फक्त ‘इतक्या’ दिवसात कमवला 50000 कोटींचा गल्ला

लोक आयफोनला स्वतःच्या जिवापेक्षाही जास्त जपतात. तसंच आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपल भारतात आपला ठसा उमटवताना दिसत आहे.

Apple चा भारतात डंका! फक्त 'इतक्या' दिवसात कमवला 50000 कोटींचा गल्ला
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 8:57 PM

मुंबई : संपूर्ण जगभरात आयफोन प्रेमी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. आयफोन म्हणजे लोकांचा जीव की प्राण झाला आहे. लोक आयफोनला स्वतःच्या जिवापेक्षाही जास्त जपतात. तसंच आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपल भारतात आपला ठसा उमटवताना दिसत आहे. ॲपल कंपनीच्या उत्पादनांची विक्री प्रचंड आहे.

आयफोन निर्माता Apple उद्या भारतात आपलं पहिलं रिटेल स्टोअर उघडणार आहे.  यावेळी कंपनीचे सीईओ टीम कुक स्वत: मुंबईत येणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की ॲपल कंपनीने भारतात विक्रमी विक्री केली आहे.  कंपनीचा महसूल जवळपास 50,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे.

Apple ने भारतात मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस $6 अब्ज (सुमारे 49,200 कोटी रुपये) एवढी विक्री केली आहे. यातून भारताची बाजारपेठ अॅपलसाठी किती महत्त्वाची बनली आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे आता कंपनी मुंबई आणि दिल्लीतही आपले खास स्टोअर उघडणार आहे.

Apple च्या कमाईत 50% वाढ

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारतात अॅपलचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा महसूल मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये $4.1 अब्ज होता.  4 मे रोजी apple आपला तिमाही निकाल जाहीर करणार आहे.

अॅपलसाठी भारत देश महत्त्वाचा

भारताची बाजारपेठ अॅपलसाठी खूप महत्त्वाची आहे.  उच्च श्रेणीचे उत्पादन असल्यामुळे ॲपल कंपनी भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत फारसा प्रवेश करू शकली नाही. तसेच कंपनीचा मार्केट शेअरही जास्त नाही. त्यामुळेच  आता कंपनी आपली विक्री वाढवण्यावर भर देत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.