आयफोनच्या चाहत्यांना Apple चे धक्कातंत्र, हे तीन प्रचंड लोकप्रिय फोन भारतातून हद्दपार
Apple ने कोट्यवधी भारतीय चाहत्यांना झटका दिला आहे. या कंपनीने भारतातील आपले तीन आयफोन मॉडेलची विक्री बंद केली आहे. कंपनी आपल्या ए्प्पलमधून स्टोअरमधून देखील या फोनना हटवले आहे.

Apple चा आयफोन म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. परंतू आयफोनच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. कारण iPhone 16e लाँच झाल्यानंतर Apple कंपनीने तीन लोकप्रिय आयफोन मॉडेल भारतातील एप्पल स्टोअर मधून हटवले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये नवीन iPhone 16 मालिका लाँच केल्यानंतर एप्पलने त्यांचे अनेक आयफोन मॉडेलना बाजारात हटविले होते. यात iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि iPhone 13 चा समावेश होता. आता या तीन फोनशिवाय आणखी तीन आयफोन भारतीय बाजारातून हद्दपार करणार आहेत.
बंद झाले हे तीन मॉडेल्स
iPhone 16e ला साल २०२२ मध्ये लाँच केलेल्या iPhone SE 3 चे अपग्रेड मॉडेल्स म्हटले जात आहे. कंपनीचा हा लेटेस्ट आयफोन कंपनीने SE मॉडेलच्या तुलनेत मोठ्या अपडेटने मिळतो. यात प्रथमच फेस आयडीचा वापर केला गेलेला आहे. हा आयफोन लेटेस्ट A18 Bionic चिप आणि इन हाऊस 5G मॉडेल सह बाजारात उपलब्ध आहे. एप्पल स्टोअरमधून साल २०२२ मध्ये लाँच झालेल्या iPhone SE 3 हटविले आहे. हा आईफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अन्य रिटेल स्टोअरमध्ये केवळ स्टॉक संपपर्यंतच मिळणार आहे.
साल २०२२ मध्ये लाँच झालेला iPhone 14 आणि iPhone 14 Plus ला देखील एप्पलने अधिकृतरित्या एप्पल स्टोअर मधून हटविले आहे. एप्पलच्या ऑनलाईन एप्पल स्टोअरवर दोन्ही मॉडेल आता विक्रीसाठी उपलब्ध नाही. परंतू युजर तरीही त्यांना Amazon, Flipkart किंवा अन्य रिटेल स्टोरमधून स्टॉक उपलब्ध असे पर्यंत घेऊ शकणार आहेत.
iPhone 16eचे फिचर्स
iPhone 16e हा लेटेस्ट प्रोसेसर सह iOS 18 या ऑपरेटींग सिस्टीम बरोबर मिळतो. या सोबत युजर्सना Apple Intelligence फिचरचा लाभ देखील मिळत आहे. एप्पलचा हा आयफोन 48MP सिंगल रिअर कॅमेऱ्या सोबत मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 12MP चा कॅमेरा बसविलेला आहे.या लेटेस्ट आयफोनच्या बॅटरीला इम्प्रुव्ह केले गेले असा दावा कंपनीने केला आहे. हा आयफोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोअरेज सह मिळतो. याची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये आहे.