Apple Store India: राजधानीत उद्या होणार ॲपल स्टोअरचे उद्घाटन, जय्यत तयारी सुरू

Apple Store Delhi : भारतातील दुसरे ॲपल स्टोअर दिल्लीतील साकेत येथे उघडणार आहे. मुंबईत नुकतेच ॲपल स्टोअरचे उद्घाटन झाले. आता दिल्ली स्टोअरच्या लॉन्चिंगबाबतही बरीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

Apple Store India: राजधानीत उद्या होणार ॲपल स्टोअरचे उद्घाटन, जय्यत तयारी सुरू
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:55 PM

नवी दिल्ली : भारतात आता ॲपल स्टोअरची (apple store) सुरूवात झाली आहे. कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाल्याचा पार्श्वभूमीवर ॲपलचे सीईओ टीम कुक (tim cook) यांच्या हस्ते मुंबईत काल (18 एप्रिल) ॲपल स्टोअरचे उद्घाटन झाले. आता राजधानी दिल्लीचा (Delhi) नंबर लागणार असून, उद्या (20 एप्रिल) साकेत (saket) येथे नव्या ॲपल स्टोअरचे उद्घाटन होईल. त्यासाठी जोरात तयारी सुरू आहे. राजधानीतील ॲपल स्टोअरच्या उद्घाटनाबाबत कंपनी आणि ग्राहक खूप उत्सुक आहेत. उद्या सकाळी 10 वाजता ॲपल स्टोअर साकेतचे दरवाजे सर्वांसाठी उघडतील.

यासाठी नेमकी काय तयारी सुरू आहे, ते जाणून घेऊया.

तुम्हीही दिल्ली-एनसीआरमध्ये राहत असाल तर तुम्ही या खास क्षणाचे साक्षीदार होऊ शकता. दिल्ली ॲपल स्टोअरचे उद्घाटन उद्या सकाळी 10 वाजता होईल. हे स्टोअर सिलेक्ट सिटीवॉक मॉल, साकेत, दिल्ली येथे आहे. अॅपल स्टोअर साकेत हे 10,000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरले आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीचा वारसा दाखवणारे ॲपल स्टोअर

मुंबईत स्टोअरच्या लॉंचिंगपूर्वी ॲपल स्टोअरबाहेर मोठी गर्दी जमली होती. दिल्लीतही असेच काहीसे पाहायला मिळू शकते. इथेही ॲपल स्टोअरची खूप क्रेझ आहे. सध्या मॉलमधील स्टोअरच्या जागेत एक अतिशय सुंदर दर्शनी भाग आहे. यातून दिल्लीचा ऐतिहासिक वारसा दिसून येतो. त्याचबरोबर बॅरिकेडवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. तुम्ही ते स्कॅन केल्यास, तुम्हाला स्टोअर अपडेट्स आणि उत्पादनांबद्दल माहिती मिळेल.

दिल्ली स्पेशल संगीताचा अनुभव

या कोडद्वारे तुम्ही Apple Saket चे वॉलपेपर देखील डाउनलोड करू शकता. दिल्लीतील ॲपल स्टोअरवर उपलब्ध असणारा एक उत्तम अनुभव म्हणजे ॲपल म्युझिक. इथे येऊन तुम्ही ॲपल म्युझिकवर दिल्ली स्पेशल म्युझिकचा आनंद घेऊ शकता. याशिवाय स्टोअरची पायाभूत सुविधा अप्रतिम आहे. आतापर्यंत, असे दृश्य केवळ परदेशात असलेल्या ॲपल स्टोअरमध्येच पाहिले जात होते.

ॲपल स्टोअरमध्ये मिळतील या सेवा-सुविधा

या स्टोअरमध्ये तुम्ही ॲपलच्या अनेक विशेष सेवांचा लाभ घेऊ शकता. ॲपल स्टोअरमध्ये ट्रेड इन प्रोग्राम देखील उपलब्ध असेल. त्याच वेळी, जीनियस बार ही एक वेगळी गोष्ट आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीतील ग्राहकांसाठी लेटेस्ट आयफोन, मॅक, आयपॅड, एअरपॉड, ॲपल वॉच आणि ॲपल टीव्ही सारखी उत्पादने प्रदर्शित केली जातील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.