खरेदी न करता Iphone वापरा, Apple चा नवा प्लॅन, सब्सक्रिप्शनवर मिळणार फोन आणि सर्व्हिसेस

टेक इंडस्ट्रीत काहीही नवीन करण्याचा विचार केला तर ॲपलचे (Apple) नाव पहिल्या रांगेत आहे. फोनमधील 3.5mm ऑडिओ जॅक काढणे असो किंवा पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली बॉक्समधून चार्जर काढून टाकणे असो, ॲपलने इतर स्मार्टफोन कंपन्यांच्या आधी अशी पावलं उचलली आहेत.

खरेदी न करता Iphone वापरा, Apple चा नवा प्लॅन, सब्सक्रिप्शनवर मिळणार फोन आणि सर्व्हिसेस
iPhone 13 Image Credit source: Apple
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 5:31 PM

मुंबई : टेक इंडस्ट्रीत काहीही नवीन करण्याचा विचार केला तर ॲपलचे (Apple) नाव पहिल्या रांगेत आहे. फोनमधील 3.5mm ऑडिओ जॅक काढणे असो किंवा पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली बॉक्समधून चार्जर काढून टाकणे असो, ॲपलने इतर स्मार्टफोन कंपन्यांच्या आधी अशी पावलं उचलली आहेत. नव्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, ॲपल कंपनी सबस्क्रिप्शन सेवेवर काम करत आहे, ज्या अंतर्गत कंपनी आयफोन आणि इतर हार्डवेअर उत्पादने देऊ शकते. ब्रँड आपली हार्डवेअर (Hardware) उत्पादने सबस्क्रिप्शन आधारित विक्रीकडे नेण्याचा विचार करत आहे. मात्र, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ॲपल सब्सक्रिप्शनवर (Apple subscription) आपला आयफोन आणि आयपॅड विकेल, त्यानंतर ग्राहकांना/युजर्सना प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम भरावी लागेल.

ग्राहकांना ॲपलची ही उत्पादने खरेदी करण्याची गरज भासणार नाही. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ॲपलची हार्डवेअर सबस्क्रिप्शन सेवा अद्याप प्रोसेसमध्ये आहे आणि ॲपल कंपनी या वर्षाच्या अखेरीस ती लॉन्च करू शकते.

काय आहे प्लॅन?

ॲपलसाठी सबस्क्रिप्शन खूप महत्वाचे आहे, कारण कंपनीच्या एकूण उत्पन्नात त्याचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत ॲपल केवळ सबस्क्रिप्शनवर सॉफ्टवेअर सेवा देत होती. कंपनी सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेलवर Apple Music, iCloud, Apple TV Plus, Apple Fitness Plus आणि Apple Arcade सारख्या सेवा देते. तसेच, ब्रँड Apple One बंडल ऑफर करतो, ज्यामध्ये कंपनीच्या अनेक सॉफ्टवेअर सेवांचे सबस्क्रिप्शन एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.

किती पैसे द्यावे लागणार?

सबस्क्रिप्शनवर हार्डवेअर विकणे ही Apple ची सर्वात मोठी सबस्क्रिप्शन सेवा असेल आणि सॉफ्टवेअरप्रमाणे कंपनी Apple One सबस्क्रिप्शन बंडलसह iPhone देखील लॉन्च करू शकते. ब्लूमबर्गच्या मते, हार्डवेअर सबस्क्रिप्शन सेवेवर इन्स्टॉलेशनप्रमाणे शुल्क आकारले जाणार नाही, ज्यामध्ये तुम्ही 12 किंवा 24 महिन्यांच्या आत डिव्हाइसची संपूर्ण किंमत भरता. आयफोन सबस्क्रिप्शनमध्ये, युजर्स नवीन हार्डवेअरमध्ये अपग्रेड करण्यास सक्षम असतील. मात्र, त्याची रक्कम किती असेल, याबाबत सध्या माहिती उपलब्ध नाही.

Apple ग्राहकांकडून सब्सक्रिप्शन म्हणून एक विशिष्ट शुल्क आकारू शकते, ज्यामध्ये आयफोनच्या किंमतीचा काही भाग समाविष्ट असेल. तसेच, जेव्हा पुढील iPhone लाँच होईल, तेव्हा तुम्ही तो विकत न घेता तुमचे डिव्हाइस अपग्रेड करू शकाल. ॲपल आपल्या सॉफ्टवेअर सेवा देखील यामध्ये जोडू शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Apple Working on Subscription Service for iPhones, Hardware and Servicees)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.