iPhone चा कॅमेरा खास, सुरु झाली त्याची जगभर चर्चा

Apple iPhone | पुढील वर्षात नवीन iPhone दाखल होत आहे. आयफोन 15 ने जगभरात भारताची मोहर उमटवली. या फोनची यंदा खास चर्चा झाली. हे वर्ष भारतीय युझर्ससाठी फायद्याचे ठरले. त्यांना मुंबई आणि दिल्लीतील Apple स्टोअरमधून त्याची थेट खरेदी करता आली. आता नवीन आयफोनच्या कॅमेऱ्याची चर्चा सुरु झाली आहे. iPhone 15 Pro Max मधील एक खास लेन्स या नवीन आयफोनमध्ये असेल.

iPhone चा कॅमेरा खास, सुरु झाली त्याची जगभर चर्चा
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 11:29 AM

नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : यंदा आयफोन 15 सीरीजने जगभरात धमाल केली. यामधील नॅव्हिगेशन सिस्टिम भारतीय होती. हा दमदार आयफोन भारतात तयार झाला होता. चीनला धोबीपछाड देत या घडामोडीतून भारताने जागतिक नकाशावर नाव कोरले. या फोनमध्ये ओव्हरहिटिंगची तेवढी अडचण आली. पण एकूणच आयफोन 15 ने बाजारात नाव काढले. आता नवीन आयफोनची आताच चर्चा रंगली आहे. iPhone 15 Pro Max मधील एक खास लेन्स या नवीन आयफोनमध्ये लावण्यात येईल. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याविषयी बाजारात उत्सुकता ताणल्या गेली आहे.

iPhone 16 Series

Apple पुढील वर्षात iPhone 16 Series घेऊन येत आहे. त्यासंबंधीच्या काही बाबी समोर येत आहे. कॅमेऱ्याबाबत अधिक चर्चा होत आहे. विश्लेषक Ming-Chi Kuo ने त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने या नवीन स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max च्या कॅमेऱ्याविषयी त्याने काही माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

या लेन्सचा होईल वापर

Ming-Chi Kuo च्या दाव्यानुसार, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स ग्राहकांना अधिक झुम करण्याची सोय करणार आहे. यामध्ये टेट्राप्रिज्म कॅमरा लेन्स देण्यात येईल. या वर्षी iPhone 15 Pro Max मध्ये कंपनीने टेट्राप्रिज्म कॅमरा लेन्स दिली होती. ही नवीन लेन्स सिस्टिम 5x ऑप्टिकल झूम करण्यास सक्षम आहे.तर दुसरीकडे iPhone 15 Pro में 3x ऑप्टिकल झुमचा पर्याय मिळतो.

डिस्प्ले डिटेल्स

कॅमेऱ्याशिवाय iPhone 16 Pro मध्ये वापरकर्त्यांना मोठा डिस्प्ले मिळेल. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार डिस्प्लेचा दावा करण्यात आला आहे. आयफोन 16 प्रो मध्ये 6.27 इंच स्क्रीन, तर आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 6.86 इंचची स्क्रीन असेल. प्रो मॉडल्समध्ये लो-टेंपरेचर पॉलिक्रिस्टेलीन ऑक्साइड टेक्नोलॉजी आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटची क्षमता असेल. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस मॉडल्समध्ये 6.12 इंच आणि 6.69 इंच डिस्प्ले साईजसह 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल.

बॅटरी डिटेल्स

आयफोन 15 प्रोचा अपग्रेड मॉडल आयफोन 16 प्रो मधील बॅटरीविषयी टिप्स्टर Kosutami याने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यावेळी ओव्हरहिटिंगचा इश्यू पाहता खास काळजी घेण्यात येत आहे. इंप्रूव्ड थर्मल मॅनेजमेंटचा वापर करुन बॅटरीसह हा नवीन फोन बाजारात येईल. आयफोन 16 प्रो मध्ये 3355 एमएएच बॅटरी असू शकते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.