Spy in Mobile : हो हेच ते मोबाईलमधील गुप्तहेर; हे App चोरून वाचताय तुमचे मॅसेज, या ट्रिकने लगेच ओळखा

Spy Apps in Mobile : जर तुम्ही ऑफलाईन माध्यमातून एकमेकांना SMS पाठवत असाल तर सावध राहा. तुमच्या मोबाईलमधील काही App हेरगिरी करतात. तुमचे वैयक्तिक चॅटिंग, टेक्स्ट संवाद वाचले जात आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा, सेटिंगमध्ये असा बदल करा.

Spy in Mobile : हो हेच ते मोबाईलमधील गुप्तहेर; हे App चोरून वाचताय तुमचे मॅसेज, या ट्रिकने लगेच ओळखा
हे गुप्तहेर ओळखले का?
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 3:40 PM

ऑनलाईनमुळे जग जवळ आले आहे. तितकाचा धोका सुद्धा वाढला आहे. सायबर भामटे विविध आमिष दाखवून सावज हेरतात. तर काही ॲप्स तुमच्या मोबाईलमधील माहिती चोरतात. त्यात तुमचे खासगी संदेश सुद्धा सुटत नाहीत. तुम्हाला वाटत असले की नेट बंद असल्यावर काय होते. पण जेव्हा तुम्ही नेट ऑन करतात. तेव्हा तुमचे खासगीपण जपल्या गेलेले नसते. . तुमच्या मोबाईलमधील काही App हेरगिरी करतात. तुमचे वैयक्तिक चॅटिंग, टेक्स्ट संवाद वाचले जात आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा, सेटिंगमध्ये असा बदल करा.

पर्सनल चॅटिंगवर नजर

नेट ऑन नसेल तर प्रत्येक जण ऑफलाईन एसएमएसचा वापर करतो. आता तर अनेक कंपन्यांनी पॅकेजमध्ये मोफत एसएसएसची सुविधा दिली आहे. त्यामुळे अनेकजण चॅटिंगसाठी एसएमएसचा वापर करतात. जवळपास सर्वच दूरसंचार कंपन्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दिवसभरात 100 एसएमएस फ्री देतात. ओटीपीपासून ते इतर अनेक मॅसेज दिवसभरात येतात. तर काही जण पर्सनल चॅटिंगसाठी एसएमएसचा वापर करतात. तुम्हाला वाटत असेल की, हे मॅसेज कोणीच वाचत नसेल तर सावध राहा. मोबाईलमधील काही ॲप हे मॅसेज सुद्धा वाचतात हे वाचून तुम्हाला धक्का बसेल असे ते म्हणाले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तुम्ही फोनमध्ये एक सेटिंग करू शकता. ही सेटिंग पूर्ण केल्यावर कोणतेही ॲप तुमचे मॅसेज वाचणार नाही. त्यामुळे ही सेटिंग लगेच सुरू करा.

हे सुद्धा वाचा

फोनमध्ये करा ही सेटिंग सुरू

सर्वात अगोदर तुम्हाला कोण कोणते ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये हेरगिरी करत आहेत, एसएमएस वाचत आहेत, ते तपासा. त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या मोबाईलमधील सेटिंगमध्ये जावे लागेल.

1.मोबाईलमधील सेटिंगमध्ये जा

2.सेटिंगमध्ये सर्च या पर्यायावर क्लिक करा

3.SMS असे टाईप करा

4.आता शोधात परवानगी, परमिशन्स हा पर्याय समोर येईल

5.आता परमिशनवर क्लिक करा. तुमच्यासमोर एक यादी येईल

6.त्याठिकाणी कुठं कुठं एसएमएससाठी परवानगी देण्यात आली ते समोर येईल

7.या ठिकाणी एसएमएस एक्सेस्ड इन लास्ट 24 अवर यावर क्लिक करा

8.यात दोन पर्याय समोर येतील.

9.सी ऑन ॲप्स विथ धिस परमिशन यावर क्लिक करा

10.तुमच्या मोबाईलमध्ये कोण हेरगिरी करतंय ते ॲप समोर येतील

11.तुमच्या परवानगीशिवाय हे ॲप्स एसएमएस वाचतात हे उघड होईल

करा हा उपाय

तुम्ही या यादीतील एक एक ॲप्सवर जाऊन क्लिक करु शकतात. यामध्ये दोन पर्याय समोर येतील. एक परवानगी द्या आणि परवानगी देऊ नका, असे दोन पर्याय दिसतील. यातील योग्य पर्याय निवडा. तुमचा वैयक्तिक डेटा पूर्णपणे सुरक्षित होईल.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.