धुळवडीला रंग आणि पाण्यापासून स्मार्टफोनला वाचवा, कामी येतील या टिप्स

Holi 2024 : उत्तर भारतात होळी तर राज्यात धुळवडीला आनंदाला पारवार नसतो. पाणी आणि रंगांची सर्वदूर उधळण होते. पण अनेकदा खिशात इलेक्ट्रॉनिक गॅझेट तसेच राहतात. ते जर पाण्याने अथवा रंगाने भिजले तर या रंगाचा बेरंग होतो. मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तेव्हा या टिप्स पडतील तुमच्या उपयोगी...

धुळवडीला रंग आणि पाण्यापासून स्मार्टफोनला वाचवा, कामी येतील या टिप्स
रंगाचा नको बेरंग, मोबाईल असा वाचवाImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 4:05 PM

भारतात होळी आणि राज्यात रंगपंचमीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पण या रंगोत्सवाला नुकसानीचे गालबोट लागायला नको. पाणी आणि रंगांच्या विना धुळवडीची कोणी कल्पना तरी करु शकतं का? पण या दोन्ही वस्तू तुमच्या इलेक्ट्रॉनिक गझेट्ससाठी सर्वात हानीकारक ठरतात. ईअरफोन वा स्मार्टवॉच घालून तुम्ही रंगपंचमी साजरी करायला जात असाल तर नुकसान होणारच. तुमचा मोबाईल पाण्यात भिजला तर रंगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडेल. तेव्हा या टिप्स तुमच्या उपयोगी ठरतील.

मोबाईल भिजला, आता काय करु?

जर तुमचा मोबाईल भीजला अथवा रंगाचे पाणी गेल्यास, सर्वात अगोदर तो फोन स्विच ऑफ करा. त्यानंतर फोनला एका स्वच्छ कपड्याने पुसा. या फोनमध्ये सिम कार्ड ट्रे बाहेर काढा. जर बॅक पॅनल उघडता येत असेल तर ते बाहेर काढा. पण आता अनेक फोन हे नॉन-रिमुव्हएबल बॅक पॅनलचेच येत आहेत. फोन स्वच्छ करताना कोणत्याही अणकुचीदार वस्तूचा वापर करु नका.

हे सुद्धा वाचा

फोन सुखवा

फोन पाण्यात भिजला असेल तर हळूच त्यावर चापटी मारुन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. फोनला स्वच्छ केल्यानंतर तो उघड्यावर कोरडा होण्यासाठी तसाच राहू द्या. फोन कोरडा करण्यासाठी हेअर ड्रायर अथवा तांदळाचा बिलकूल वापर करु का. तांदळाच्या डब्यात फोन ठेवल्यास काही दाणे त्याच्या आत फसून फोन खराब होण्याची भीती असते.

मोबाईलला पाण्यापासून कसे वाचवणार

  1. झिप लॉक बॅग अथवा स्क्रीन प्रोटेक्टर : फोनला पाण्यापासून वाचविण्यासाठी वॉटरप्रुफ झिप लॉक पाऊचचा वापर करणे फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही टेंम्पर्ड ग्लास वा प्लास्टिक स्क्रीन गार्डचा वापर करु शकता. त्यामुळे तुम्ही ओले हात लावले तरी तुमच्या फोनचे कुठलेच नुकसान होणार नाही.
  2. पारदर्शक टेप : बाजारात अगदी पातळ पारदर्शक टेप उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही वापर करु शकता. पण टेप लावण्यापूर्वी त्यावर अधिक गोंद नसावे याची खात्री करुन घ्या. कारण एकदा टेप चिकटल्यावर तुमच्या स्पीकर अथवा माईकवर गोंद चिकटल्यास तो काढणे जिकरीचे काम होईल.
  3. वॉटरप्रुफ मोबाईल कव्हर : बाजारात वॉटरप्रुफ मोबाईल कव्हर सहज मिळते. रंगोत्सवत रंग आणि पाण्यापासून मोबाईलची सुरक्षा करण्यासाठी हे कव्हर उपयोगी ठरेल. वॉटरप्रुफ असल्याने पाणी मोबाईलमध्ये जाऊ शकत नाही.
Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.