बहुप्रतीक्षित ASUS ZenFone 8 Pro लाँचिंगच्या मार्गावर, कसा असेल नवा स्मार्टफोन?
ZenFone 8 सिरीज 12 मे रोजी जागतिक बाजारात लाँच केली जाईल. यात ZenFone 8 Mini, ZenFone 8 आणि ZenFone 8 Pro यांचा समावेश असेल.
नवी दिल्ली : ASUS ZenFone 8 Pro भारतीय बाजारात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. अलीकडेच ASUS फोनचं मॉडेल नंबर ASUS_I007D सोबत या फोनला BIS प्रमाणपत्रदेखील प्राप्त झालं आहे, जे सूचित करतंय की हा फोन लवकरच भारतीय बाजारात बाजारात लाँच केला जाऊ शकतो. या फोनचे नाव बाजारात काय असेल हे सध्या तरी समजलेले नाही. परंतु काही रिपोर्ट्स असं सूचवतायत की या फोनचं नाव ASUS झेनफोन 8 प्रो असं असू शकतं. (ASUS ZenFone 8 Pro will launch in India Soon with best Specs)
एक महत्त्वाची बाब आधीपासूनच स्पष्ट आहे की, ZenFone 8 सिरीज 12 मे रोजी जागतिक बाजारात लाँच केली जाईल. या सिरीजमध्ये तीन मॉडेल्स असू शकतात. त्यामध्ये ZenFone 8 Mini, ZenFone 8 आणि ZenFone 8 Pro यांचा समावेश केला जाईल. झेनफोन 8 प्रोच्या स्पेसिफिकेशनबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु काही लीक्सनुसार या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह 120 हर्ट्झ OLED डिस्प्ले दिले जाऊ शकतो.
5.92 इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले
समोर आलेल्या अहवालांनुसार, ASUS ZenFone 8 Pro बद्दल कंपनीने कोणतीही माहिती लीक होऊ दिलेली नाही. तर ZenFone 8 Mini मध्ये 5.92 इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असेल. या डिस्प्लेमध्ये सेल्फी स्नॅपरसाठी पंच होल कटआउट दिली जाईल.
शानदार कॅमेरा
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामध्ये 64MP सोनी आयएमएक्स 686 प्राइमरी सेन्सर आणि दुसरा सोनी आयएमएक्स 663 सेकंडरी कॅमेरा लेन्स असेल. या फोनच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते.
संबंधित बातम्या
Big Saving Days Sale : Narzo 30A ते X7 Pro 5G, Realme चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Flipkart Sale : Motorola च्या ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 21000 रुपयांची सूट
Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स
(ASUS ZenFone 8 Pro will launch in India Soon with best Specs)