मुंबई : एखादा तरी आयफोन वापरावा अशी प्रत्येकाचीच सुप्त इच्छा असतेच… परंतु आयफोनच्या किमती पाहून प्रत्येकालाच तो घेणे शक्य नसते. आता आयफोन घेण्यासाठी विविध ईएमआयची सुविधा असली तरी त्यातही खिशाला बराच भार सोसावा लागत असतो. परंतु ज्यांना आता आयफोन घ्यायचा आहेत त्यांच्यासाठी फ्लिपकार्टने (Flipkart) एक चांगली संधी दिलेली आहे. अॅप्पलचा ‘आयफोन 12’ (iPhone 12) ची सध्या किंमत फ्लिपकार्टवर 56999 रुपये इतकी आहे. तर अमेझॉनवर ती 54900 रुपये इतकी ठरविण्यात आली आहे. या किंमतीमध्ये 64 जीबी स्टोरेज आणि ब्लू व्हेरिएंटमधील आयफोन उपलब्ध आहे. हा आयफोन 12 विविध फिचर्स (Features) आणि डिझाइनसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये सुपर रेटीना एक्सडीआर डिसप्ले आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा 12 मेगापिक्सल कॅमरा आहे. सोबतच यात 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरादेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीकडून या फोनसाठी ए14 बायोनिक चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
या आयफोन 12 च्या किमतीमध्ये फ्लिपकार्टने तब्बल 13 टक्के सुट दिली आहे. त्यानंतर आयफोन 12 ची किंमत 65900 वरुन 56999 इतकी झाली आहे. इकॉमर्स प्लेटफार्म असलेल्या अमेझॉननेही यात त्याहून अधिक म्हणजे तब्बल 17 टक्क्यांची सूट दिली आहे. त्यामुळे आयफोन 12 ची किंमत 65900 वरुन कमी होउन 52999 इतकी झाली आहे.
आतापर्यंतच्या विविध सेलमधील हा सर्वाधिक सवलत देणारा सेल ठरत आहे. विविध कंपन्यांकडून मोबाईलच्या खरेदीवर आकर्षक सुट देण्यात येणारे सेल आयोजीत करण्यात आले आहेत.
दरम्यान, फ्लिपकार्टवर आयफोन 12 च्या खरेदीनंतर जुन्या स्मार्टफोनला एक्सचेंज करण्याचीही ऑफर देण्यात आली आहे. त्यावर जुन्या स्मार्टफोनवर 13 हजार रुपये अजून कमी होउ शकणार आहेत. ही किंमत मोबाईलच्या कंडिशन आणि ब्रँडवर अवलंबून राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या