Tips and Tricks : स्मार्टफोन स्मार्टली वापरता का ? फोन वापरताना या चुका केल्यात तर पडेल भारी, लगेच बदला सवयी

स्मार्टफोन किंवा मोबाईल वापरताना आजकाल बरेच लोक काही चुका करतात, जे फक्त फोनसाठीच नव्हे तर बॅटरीसाठीही घातक ठरू शकते.

Tips and Tricks : स्मार्टफोन स्मार्टली वापरता का ? फोन वापरताना या चुका केल्यात तर पडेल भारी, लगेच बदला सवयी
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 9:17 AM

नवी दिल्ली : आजकाल मोबाईल (mobile) हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मेसेजिंगपासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, बिल भरण्यापासून ते काहीही खरेदी करण्यापर्यंत सगळे दैनंदिन व्यवहार मोबाईलवर आरामात होत असतात. लहान मुलं असोत वा वृद्ध नागरिक, मोबाईल (smartphone) हा हक्काचा एंटरटेनमेंट कॉर्नरही झाला आहे. आपण सर्वजण रोज मोबाईल फोन वापरतो, परंतु स्मार्टफोन वापरताना काही सामान्य चुका होतात. या चुका नंतर फोनची बॅटरी (battery) आणि तुमच्या स्मार्टफोनसाठी या दोघांसाठीही अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे मोबाईल वापरताना कोणत्या चुका टाळल्या (avoid mistakes) पाहिजेत, ते समजून घेऊया.

केबल आणि चार्जरशी संबंधित या चुका टाळा

बहुतांश लोक सहसा ही चूक करतात. आजकाल बहुतेक स्मार्टफोन USB टाइप C चार्जिंग पोर्टसह येतात, परंतु येथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे, ती म्हणजे सर्व फोन ऑप्टिकल चार्जिंगसाठी भिन्न चार्जिंग तंत्रज्ञान वापरतात. अशा परिस्थितीत, तुमच्या फोनसोबत आलेल्या चार्जर किंवा केबलद्वारेच तुमचा फोन चार्ज करा. आणि इतर फोनची केबल किंवा चार्जर तुमच्या फोनसाठी वापरणे टाळा.

हे सुद्धा वाचा

फोन संदर्भात हा चूक पडेल महागात

लोकांची दुसरी चूक ही असते की, सकाळी उठल्यावर फोन पूर्ण चार्ज होईल, असा विचार करून रात्री झोपण्यापूर्वी ते फोन चार्जिंगला लावून ठेवतात, पण असे करणे फोनच्या बॅटरीसाठी योग्य नाही. गरज नसताना रात्रभर फोन चार्ज केल्याने तो ओव्हरचार्ज होतो. असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरी हेल्थ तर कमी होतेच पण ते तुमच्या फोनसाठीही चांगले नाही.

ॲप स्टोअर व्यतिरिक्त इतर कुठूनही ॲप डाऊनलोड करणे टाळा

तुम्हाला कोणतेही ॲप डाऊनलोड करायचे असेल तर Google Play Store शिवाय इतर कोणतेही माध्यम वापरू नका. असे करणे खूपच महागात पडू शकते. Apple थर्ड पार्टी ॲप्स किंवा वेबसाइटवरून डाउनलोड केलेले ॲप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी देत ​​नाही. दुसरीकडे, Android फोनमध्ये, लोक सहसा कोणत्याही साइटवरून एपीके फाइल डाउनलोड करतात आणि फोनमध्ये इन्स्टॉल करतात. असे करणे फोनसाठी धोकादायक ठरू शकते कारण या फाइल्समध्ये मालवेअर किंवा व्हायरस असू शकतो जो तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतो.

पब्लिक वायफायचा वापर करणे घातक

अनेक सार्वजनिक ठिकाणी पब्लिक वायफाय असते. ते स्वस्त किंवा फ्री तर असतेच पण पटकन वापरताही येते. मात्र पब्लिक वायफायचा वापर हॅकर्स युजर्सची खासगी माहिती चोरण्यासाठीही करु शकतात. त्यामळे असे वायफाय वापरणे टाळावे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.