Upstox वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी, ग्राहकांची माहिती लीक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कंपनीच्या संकेतस्थळावर अपस्टॉक्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले की, ग्राहकांचा फंड आणि सुरक्षितता डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. (Bad news for Upstox users, leaked customer information, know the whole case)

Upstox वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी, ग्राहकांची माहिती लीक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Upstox वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी, ग्राहकांची माहिती लीक
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:04 AM

नवी दिल्ली : MobiKwik, Facebook आणि Linkedin संस्थेच्या डेटा लिकनंतर आता अन्य एका कंपनीचा डेटा लीक झाल्याचे प्रकरणही समोर आले आहे. रिटेल ब्रोकिंग कंपनी अपस्टॉक्स(Upstox)ने आपल्या ग्राहकांना मोठ्या डेटा लिकबाबत सतर्क केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांचा कॉन्टॅक्ट डेटा आणि केवायसी तपशील लिक झाला आहे. तथापि, त्याच वेळी कंपनीने आश्वासन दिले आहे की ग्राहकांचा फंड आणि सुरक्षितता तपशील पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर अपस्टॉक्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले की, ग्राहकांचा फंड आणि सुरक्षितता डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. (Bad news for Upstox users, leaked customer information, know the whole case)

डेटा लिकबद्दल अपस्टॉक्सने काय म्हणाले?

या अहवालानुसार कंपनीच्या प्रवक्त्याने ईमेलने पाठवलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, ”आमच्या डेटाबेसमध्ये अनधिकृत प्रवेशाचा दावा करणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर आम्ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा कंपनीला तृतीय-पक्षाच्या डेटा वेअरहाउस सिस्टममधील केवायसी डेटामधील उल्लंघन तपासण्यास सांगितले आहे.” प्रवक्त्याने सांगितले की, आज सकाळी हॅकर्सनी आमच्या डेटाचे नमुने डार्क वेबवर ठेवले आहेत. प्रवक्त्याने सांगितले की तातडीने केलेल्या उपाययोजनांच्या अंतर्गत कंपनीने अनेक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत, विशेषत: तृतीय पक्षाच्या वेअरहाऊसमध्ये अनेक सुरक्षेची पावले उचलली आहेत.

पासवर्ड रिसेट करण्यासाठी कंपनीने पाठवला मॅसेज

कंपनीने सांगितले की, आम्ही सावधगिरीने सुरक्षितपणे सर्व अपस्टॉक्स वापरकर्त्यांसाठी पासवर्ड नव्याने सेट केला आहे. अपस्टॉक्स आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेस प्रथम प्राधान्य देतो. प्रवक्त्याने सांगितले, अपस्टॉक्सच्या सर्व ग्राहकांचे फंड व सिक्युरिटी सुरक्षित आहेत. आम्ही या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. यासह, कंपनीने असेही म्हटले आहे की किती ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे याची त्यांना माहिती नाही. कंपनीने सर्व ग्राहकांना युनिक स्ट्रॉन्ग पासवर्ड सेट करण्यास सांगितले आहे, जे जुन्या व्हर्जनपेक्षा भिन्न असेल. याशिवाय ओटीपी कोणाबरोबरही शेअर करू नका असेही सांगण्यात आले आहे. यासह, ग्राहकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक टाळण्यास सांगितले गेले आहे आणि कोणतीही लिंक योग्य प्रकारे तपासण्यास सांगितले आहे. (Bad news for Upstox users, leaked customer information, know the whole case)

इतर बातम्या

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : रायगड जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसीचे 9 लाख डोस, लवकरच आणखी 5 लाख डोस येणार 

नागरिकांनी फेकून दिलेल्या मास्कचा चक्क गादी बनवण्यासाठी वापर, जळगावात धक्कादायक प्रकार उघड

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.