Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मशीनपासून राहा चार हात लांब, मोबाईलच नाही तर कार पण होईल हॅक

Flipper Zero Hacking | तुमचा मोबाईलच नाही तर कार पण हे पॉवरफुल डिव्हाईस हॅक करु शकते. ते तुमची माहिती, डेटा चोरू शकते. या डिव्हाईसचे नाव Flipper Zero असे आहे. हे डिव्हाईस त्या प्रत्येक डिव्हाईसला हॅक करु शकते जे वायरलेस फ्रीक्वेन्सीवर काम करते. जाणून घ्या कसे काम करते हे डिव्हाईस...

या मशीनपासून राहा चार हात लांब, मोबाईलच नाही तर कार पण होईल हॅक
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 11:16 AM

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 :  Hacking हा शब्द ऐकला तरी आपल्याला भीती वाटते. कारण त्यामुळे आपली गोपनिय माहिती उघड होते. ती चोरीला गेल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. अनेक जणांना आर्थिक फटका बसू शकतो. वैयक्तिक माहितीचा गैरफायदा घेऊन ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडू शकतात. बाजारात असे काही दमदार डिव्हाईस आहेत की जे तुमचा मोबाईलच नाही तर कार सुद्धा हॅक करु शकतात. त्यामुळे एक जोरदार डिव्हाईस म्हणजे Flipper Zero हे आहे. हे डिव्हाईस कसे काम करते, त्याचा धोका ओळखून कसे चार हात दूर राहावे याची माहिती असणे आवश्यक आहे. हे डिव्हाईस नुकसानकारक असल्याने त्याचा फटका बसतो.

आहे तरी काय Flipper Zero?

हे एक पोर्टेबल डिव्हाईस आहे. ते एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी नेणे अगदी सोपे आहे. हे डिव्हाईस पॉकेटमध्ये पण ठेवता येते. हायटेक फीचर्सने ते परिपूर्ण आहे. या डिव्हाईसच्या समोरच्या बाजूला एक छोटे डिस्प्ले आणि काही बटण, पोर्टसचा समावेश असतो.

हे सुद्धा वाचा

काय करते Flipper Zero?

या यंत्रात एक सब गीगाहर्ट्ज वायरलेस एंटीना आहे, जो वायरलेस डिव्हाईसला संचालित, ऑपरेट करु शकतो. या यंत्राच्या सहायाने वायरलेस डिव्हाईस सिस्टम नित्रंत्रित करता येते. हे यंत्र वायरलेस कोड्स कॅप्चर आणि ट्रांसमिट करते. त्यामुळे इतर डिव्हाईसला कमांड पण देता येते.

असा वापर होण्याची भीती

प्रत्येक वस्तूचे फायदे आणि तोटे आहेत. तसेच प्रत्येक डिव्हाईसचे काही फायदे असतात तर काही यंत्र नुकसान करु शकतात. काही रिपोर्ट्सनुसार, Flipper Zeroच्या मदतीने मोबाईल व इतर यंत्र हॅक करता येतात. त्याआधारे वायफाय, एटीएम कार्ड आणि इतर यंत्रांचा एक्सेस घेता येतो. कार सुद्धा अनलॉक करता येते.

कार पण नाही सुरक्षित

ज्या वस्तू वायरलेस फ्रिक्वेन्सीवर काम करातत, त्या सर्व डिव्हाईसवर हे यंत्र नियंत्रण मिळवू शकते. ते यंत्र हॅक करु शकते. कम्प्यूटराईज्ड कीने, किल्लीने कार अनलॉक करण्यासाठी याचा वापर करता येतो. तुमच्या कारच्या कीमधील फ्रिक्वेन्सी कॅप्चर करुन कॉपी आणि सेव्ह करते. त्यामुळे वायरलेस फ्रिक्वेन्सीवरील कार अनलॉक करता येते.

'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'
'मुख्यमंत्री करू', पटोलेंच्या ऑफरवर शिंदे म्हणाले, 'ज्याला आवडेल...'.
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी
खोक्याची रवानगी कोठडीत; शिरूर कोर्टाकडून 8 दिवसांची पोलीस कोठडी.
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा
मालेगाव निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला? माजी आमदाराचा खळबळजनक दावा.
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले
बुलढण्यात वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, घुलेचे फोटो जाळले.
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार
खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार.
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा
पवारांच्या नावानं बोंब अन् सदावर्तेंकडून ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा.
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा
धूळवड स्पेशल बेतासाठी मुंबईत मटणाच्या दुकानांबाहेर लागल्या रांगा.