Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fake Apps : झटक्यात ओळखा फेक ॲप! अशी पटकन करा खातरजमा

Fake Apps : फेक ॲपची अशी झटक्यात ओळख पटवाता येईल. ॲप डाऊनलोड करताना सजग असणे गरजेचे आहे.

Fake Apps : झटक्यात ओळखा फेक ॲप! अशी पटकन करा खातरजमा
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 11:25 AM

नवी दिल्ली : सध्या कोणत्याही कामासाठी स्पेशल ॲप सहज उपलब्ध आहेत. युझर्सला यामुळे मोठा फायदा होतो. त्यांना अनेक कामे या ॲपच्या माध्यमातून करता येतात. हे ॲप लोण्यासारखे सहज चालतात, त्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा फायदा होतो. पण ॲपच्या माध्यमातून सायबर भामटे (Cyber Scammers) पण त्यांची पोळी शेकतात. या ॲपच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडतात. युझर्सची गोपनिय माहिती चोरून त्यांना ब्लॅकमेल करणे अथवा बँक खात्यातील रक्कम चोरीचे अनेक प्रकार घडतात. नकली ॲप (Fake App) अत्यंत धोकादायक असतात. त्याचा मोठा फटका बसतो. मोबाईल हॅक करुन तुमचे गुपितं फोडण्याची धमकी देऊन पैसे उकळण्यात येतात.

अस्सल ॲप त्यामुळे ॲप डाऊनलोड करताना त्याची खातरजमा करा. अस्सल ॲपचा वापर करता येणे गरजेचे आहे. पण प्रश्न येतो की, खरे आणि खोटे ॲपची ओळख पटणार तरी कशी? तर त्यासाठी मोठी चिंता करण्याची गरज नाही. आता अनेक तंत्रामुळे नकली ॲपची ओळख पटविणे सोपे झाले आहे.

युट्यूब, नेटफ्लिक्स, इन्स्टाग्राममार्फत फेक ॲप बाजारात युट्यूब, नेटफ्लिक्स, चॅटजीपीटी, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन फेक ॲपचा सुळसुळाट वाढला आहे. सायबर भामटे, गुन्हेगार हे ॲप विविध चॅनल्स, मॅसेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे ॲप पोहचवितात. पहिल्यांदा हे ॲप खोटे असल्याची किचिंत ही शंका येत नाही. जर तुम्हाला खऱ्या-खोट्या ॲपची माहिती हवी असेल तर काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

हे सुद्धा वाचा

अशी पटवा फेक ॲपची ओळख

  1. गुगल प्ले स्टोअर : तुम्ही ॲड्राँईड युझर असाल तर केवळ गुगल प्ले स्टोअरवरील ॲप डाऊनलोड करु शकतात. त्यातही त्याचे रेटिंग जरुर चेक करा. याठिकाणचे ॲप सुरक्षित मानण्यात येतात. चांगल्या कंपन्यांचं अधिकृत ॲप तुम्ही या प्लॅटफॉर्मवरुन डाऊनलोड करु शकता.
  2. ॲप्पल ॲप स्टोअर : आयफोन वा आयपॅड युझर्ससाठी ॲप्पल ॲप स्टोअर सर्वात चांगला पर्याय आहे. सध्याचे ॲप सुरक्षित आहेत. या ॲपमुळे कोणताही धोका नसतो. गुगल प्ले स्टोअरप्रमाणेच ॲप्पल ॲप स्टोअरवर अस्सल ॲपची मोठी संख्या आहे.
  3. अधिकृत संकेतस्थळ : जर तुम्ही ऑनलाईन ॲप शोधत असाल तर या त्या ॲपच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जा. याठिकाणी तुम्हाला योग्य ॲप डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल. या संकेतस्थळावर दोन प्रकारच्या लिंक मिळतात. एक गुगल प्ले स्टोअर आणि दुसरा पर्याय ॲप्पल ॲप स्टोअरच पर्याय मिळतो. त्याठिकाणाहून तुम्ही ॲप डाऊनलोड करु शकता.
  4. HTTPS : ऑफिशिअल वेबसाइटचा ॲड्रेस म्हणजे यूआरएल जरूर चेक करा. जर यूआरएल https ने सुरु होत असेल तर त्याचा अर्थ ही वेबसाईट सुरक्षित आहे. जर वेबसाईटची सुरुवात केवळ http ने होत असेल तर समजा, काहीतरी गडबड आहे. अस्सल ॲप https साईट असतात. तर http वेबसाईटवर नकील ॲप असतात. शक्यतोवर कोणत्याही अनोळखी ॲपवरुन ॲप डाऊनलोड करु नका. तुमचा मोबाईल अपडेट करत रहा.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.