डिलीट करायचाय Paytm वरील तुमचा तपशील, हटवा अशी वैयक्तिक माहिती
Paytm Delete | पेटीएमवरुन वैयक्तिक माहिती डिलीट करायची आहे का? त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्या मदतीने तुम्ही पेटीएमवरील तुमचे खातेच नाही तर इतर तपशील पण सहज हटवू शकता. तुमची वैयक्तिक माहिती आणि KYC या ॲपवरुन हटवू शकता. जाणून घ्या सोपी प्रक्रिया...
नवी दिल्ली | 5 March 2024 : Paytm Payment Bank वर आरबीआयने कडक कारवाई केली. त्यानंतर पेटीएमविरोधात अजूनही ग्राहकांच्या मनात साशंकता आहे. भारतात पेटीएमचा मोठा वर्ग आहे. पेटीएमचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हे ॲप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. पण पेटीएम पेमेंट बँकवर कारवाई केली. त्यामुळे या बँकेवरुन ग्राहकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे पेटीएम वापरकर्त्यांची संख्या रोडवत आहे. अनेक जण थेट हे ॲप डिलीट करत आहेत. पण थेट हे ॲप डिलीट करण्यापूर्वी त्यावरील तुमची वैयक्तिक माहिती डिलीट करणे, आधार कार्डसह इतर वैयक्तिक माहिती हटविणे जास्त गरजेचे आहे. अशी डिलीट करा तुमची माहिती…
काय काय हटविता येईल
तुम्ही तुमचे पेटीएम खाते डिलीट करु शकता. याशिवाय तुम्ही तुमची KYC शी संबंधित सर्व माहिती डिलीट करु शकता. कंपनीने अजून व्यवहाराची हिस्ट्री डिलीट करण्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
कसे डिलीट करणार खाते?
- Paytm Wallet खाते डिलीट करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील
- सर्वात अगोदर तुमच्या पेटीएम खात्यात लॉगीन करा
- आता सर्वात वरील कोपऱ्यातील हॅमबर्गर मेन्यूवर क्लिक करा
- या ठिकाणी पेटीएम वापरकर्त्याला 24X 7 Help हा पर्याय दिसेल
- यामध्ये Profile Setting वर क्लिक करा
- हा पर्याय More Products and Services वर क्लिक करा
- I need to close/delete my Account हा पर्याय निवडा
- पेटीएम खाते बंद करण्याचे कारण द्या. I do not use this Paytm account वर क्लिक करा
- त्यानंतर आता Message Us हा पर्याय निवडा. कंपनी रिव्ह्यूसाठी एक कॉल करेल
- कॉल संपल्यानंतर एक मॅसेज येईल. त्यावरील लिंकवर क्लिक करुन खाते बंद करता येईल
केवायसी तपशील असा हटवा
- तुम्ही तुमचा KYC तपशील पेटीएम खात्यावरुन हटवू शकता
- त्यासाठी ई-मेल करुन पेटीएमच्या ग्राहक सेवा मदत कक्षाशी संपर्क करा
- तुम्ही पेटीएमच्या ग्राहक सेवा केंद्राच्या मदत क्रमांकावर(Helpline Number) संपर्क करु शकता
- पेटीएमला तुमचा केवायसी तपशील हटविण्याची विनंती करा
- तुमचा तपशील तपासल्यानंतर सदर कागदपत्रे डिलीट करता येतात
- पण कस्टमर केअर क्रमांक नीट पडताळून पाहा. नाहीतर तुम्ही नाहक सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकाल