लाँचिंगपूर्वीच हिरोच्या नव्या बाईकचे फोटो लिक

मुंबई : Hero MotoCorp एक नवीन मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच हिरो कंपनीच्या एका बाईकचा व्हिडीओ ऑनलाईन लिक झाला आहे. यामुळे हिरो कंपनी नवीन स्पोर्ट लूक बाईक बाजारत लाँच करणार असल्याची चर्चा सुरु आहे. व्हिडीओमध्ये या स्पोर्ट्स लुकच्या बाईकची माहिती समोर आली आहे. ही बाईक HX200R किंवा नेक्स्ट जनरेशन Hero Karizma या नावाने लाँच […]

लाँचिंगपूर्वीच हिरोच्या नव्या बाईकचे फोटो लिक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : Hero MotoCorp एक नवीन मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच हिरो कंपनीच्या एका बाईकचा व्हिडीओ ऑनलाईन लिक झाला आहे. यामुळे हिरो कंपनी नवीन स्पोर्ट लूक बाईक बाजारत लाँच करणार असल्याची चर्चा सुरु आहे. व्हिडीओमध्ये या स्पोर्ट्स लुकच्या बाईकची माहिती समोर आली आहे. ही बाईक HX200R किंवा नेक्स्ट जनरेशन Hero Karizma या नावाने लाँच केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. हिरोची ही नवीन बाईक Bajaj Pulsar 200 RS ला टक्कर देईल अशी शक्यताही वर्तलवली जात आहे.

लिक झालेल्या व्हिडीओमध्ये हिरोची नवी बाईक कंपनीच्या HX250R मॉडल सारखी दिसत आहे. HX250R मॉडल कंपनीने 2014 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये सादर केला होता. ही बाईक 2014 ला लाँच करण्यात येणार होती. मात्र काही कारणामुळे ही बाईक लाँच केली नाही. व्हिडीओमध्ये बाईकच्या फ्रंट फोर्क्सवर एबीएस आणि साईड पॅनलवर हिरोचा लोगो आहे. याशिवाय पूर्ण बाईकवर कोणताही स्टिकर नाही.

नवीन मोटरसायकलची अलॉय व्हील डिझाईन आणि एग्जॉस्ट पाइप हिरो Xtreme 200R  सारखा आहे. यामध्ये फ्लॅट हँडल दिला आहे. याशिवाय बाईकमध्ये डिजीटल इंस्ट्रूमेंट कंसोल दिले आहे. 2018 ला ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आलेली  XPulse 200 बाईकमध्येही डिजीटल इंस्ट्रूमेंट कंसोल दिला होता. या सर्व माहितीमुळे नवीन बाईक 200 प्लॅटफॉर्म सारखी असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Xtreme 200R  ला 199.6 सीसीचे सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 18.1bhp पॉवर आणि 17.1 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच 5 स्पीड इंजिन गिअरबॉक्स दिला आहे. तसेच नवीन बाईकमध्येही याच बाईकचे इंजिन जास्त पॉवरसोबत आहे. हिरोची ही नवीन बाईक बीएस 6 व्हर्जनमध्ये लाँच केली जात आहे. या वर्षात ही बाईक बाजारात उतरवली जाऊ शकते.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.