iPhone 14 Pro चा फस्ट लूक आला समोर… जाणून घ्या काय असणार खास…

अधिकृतपणे लाँच होण्याआधीच, iPhone 14 Pro चे काही फोटो लिक झाले आहेत. पुढील महिन्यात हा स्मार्टफोन लाँच होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून या फोनच्या लूकबाबत एकच चर्चा होती. या लेखाच्या माध्यमातून फोनचा लूक, फीचर्सची माहिती घेणार आहोत.

iPhone 14 Pro चा फस्ट लूक आला समोर... जाणून घ्या काय असणार खास...
i phone 14 maxImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 9:48 PM

मुंबई : बहुप्रतिक्षीत आयफोन 14 प्रोबद्दल (iPhone 14 Pro) एक मोठी माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन कंपनीकडून अधिकृतरित्या लाँच होण्याआधीच त्याचे फोटो लिक झाले आहेत. हा स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच होणार होता. iPhone 14 Pro हा या सीरिजमधील लेटेस्ट स्मार्टफोन आहे. त्यामुळे या फोनबाबत ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सूकता होती. विशेष म्हणजे या अपकमिंग स्मार्टफोनचा लूक कसा असेल, याबाबतही खूप चर्चा होती. या सोबतच एक व्हिडिओही समोर आला आहे. ॲप्पलकडून (Apple) एका इव्हेंटची घोषणा झाली असून त्यात हा स्मार्टफोन लाँच होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. आयफोनच्या अपकमिंग लाइनअपबद्दल अनेक लिक समोर आले आहेत. आयफोन 14 सीरीजअंतर्गत, कंपनी चार नवीन स्मार्टफोन (four new smartphones) लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यापैकी दोन स्मार्टफोन प्रो व्हेरिएंट असतील. या दोन फोनमध्ये मुख्यतः स्क्रीनच्या साइजमध्ये फरक दिसू शकतो. परंतु, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हे सहा मोठे बदल दिसणार

– iPhone 14 Pro च्या लिक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, त्याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाउ शकतो. त्याच बरोबर हा स्मार्ट फिनिशिंगसह, आकर्षक टेक्चरमध्ये उपलब्ध होउ शकतो.

– iPhone 14 Pro मध्ये फ्रंटला कॅप्सूलच्या आकाराचा नॉच वापरण्यात आला आहे, त्यामध्ये स्क्रीन सेंसर किंवा ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात येउ शकतो. तर iPhone 13 Pro मध्ये नॉचचा मोठा आणि चौडा आकार देण्यात आला आहे.

– स्क्रीनवर असलेल्या नॉच व्यतिरिक्त, अपकमिंग फोन स्क्रीनच्या आकारावरून जुन्या iPhone 13 Pro सारखा दिसतो. तसेच, कंपनीने या स्मार्टफोनच्या डिझाइनमध्येही फारसा बदल केलेला दिसत नाही.

– iPhone 14 Pro मध्ये कंपनी A16 Bionic चिपसेटचा वापर करण्याची शक्यता आहे. हा A13 Bionic चिपसेटचा अपग्रेड प्रोसेसर आहे.

– iPhone 14 Pro चा कॅमेरा सेटअपही दमदार आहे. अपकमिंग iPhone मध्ये सध्याच्या iPhone सीरिजपेक्षा चांगले कॅमेरा सेंसर आणि मोड असतील.

– आयफोन 14 प्रोचा डिस्प्ले बेझल सध्याच्या व्हेरियंटपेक्षा किंचित लहान असेल, या लूकमध्ये अपकमिंग आयफोन अधिक प्रीमिअम दिसेल असा विश्वास कंपनीला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.