Google Maps वर विश्वास नाही, मग ‘हे’ ॲप एकदा वापरुन बघा

Google Maps मुळे नुकतीच एक कार पुलावरून पडल्याची घटना समोर आली. आता अशा परिस्थितीत जर तुमचाही Google Maps वर विश्वास नसेल, तर अशाच काही नेव्हिगेशन ॲप बद्दल आपण जाणून घेऊ. ज्याचा वापर तुम्ही करु शकता.

Google Maps वर विश्वास नाही, मग 'हे' ॲप एकदा वापरुन बघा
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 8:35 AM

अँड्रॉइड मोबाईल फोन मध्ये नेव्हिगेशन साठी ग्राहकांना आधीपासूनच google maps चे ॲप मिळत आहे. अर्थात हे ॲप जगातील सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप आहे. परंतु अनेक वेळा google maps ने लोकांना योग्य मार्ग ऐवजी चुकीचा मार्ग दाखवला आहे. ज्यामुळे काही लोकांना आपल्या जीवही गमवावा लागला आहे.

अलीकडेच google maps ने युपी मध्ये एका कार चालकाला चुकीचा रस्ता दाखवला. त्यामुळे कार बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडली आणि तीन जणांना यात आपल्या जीव गमवावा लागला आहे. यामुळे आता जर तुम्हाला गुगल मॅप्स वापरण्याची भीती वाटत असेल तर गुगल मॅप ऐवजी कोणते नेव्हिगेशन ॲप तुम्ही वापरू शकतात ते जाणून घेऊ.

Mappls Map MyIndia: Google Play Store वर एक कोटीहून अधिक लोकांनी हे नेव्हिगेशन ॲप डाऊनलोड केले आहे. या ॲप ला प्ले स्टोर वर पाच पैकी 3.9 आणि ॲप्पल ॲप स्टोअरवर पाच पैकी 4.1 रेटिंग मिळाले आहे आणि या ॲप मध्ये सुरक्षा सूचना उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त तुम्ही हे ॲप तुमच्या कारमध्ये देखील वापरू शकता.

Waze: या ॲपला ॲप्पल ॲप स्टोअरवर पाच पैकी 4.8 आणि गुगल प्ले स्टोअर वर पाच पैकी 4.1 रेटिंग मिळाले आहे. हे ॲप लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स, रिअल टाईम रोड अलर्ट, स्पीड कॅमेरे, इंधन स्टेशन ची माहिती देते.

Apple Maps: तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्ही नेव्हिगेशनसाठी हे ॲप वापरू शकता. हे ॲप आयफोन वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. वापरकर्त्यांना देखील हे ॲप आवडते. कारण हे ॲप गोपनीयतेची पूर्ण काळजी घेते आणि नेव्हिगेशनसाठी वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा संकलित करत नाही.

Here WeGo: या ॲपला गुगल प्ले स्टोअर वर वापरकर्त्यांनी पाच पैकी 4.3 रेट केले आहे, तर ॲप्पल ॲप स्टोअर वर या ॲपला पाच पैकी 3.6 रेटिंग मिळाले आहे. हे ॲप टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ऑफलाइन नकाशे, रिअल टाईम अपडेट्स, नाईट मोड आणि ॲप्पल कार प्ले ला सपोर्ट करते.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....