Betavolt Nuclear Battery | छोटी पण दमदार बॅटरी, 50 वर्षे चार्जिंग करुच नका, चीनचा नवा कारनामा
Betavolt Nuclear Battery | चीनने तंत्रज्ञानात आघाडी घेतलेली आहे. आता तिथल्या Betavolt या कंपनीने मोठी कमाल केली आहे. कंपनीने 50 वर्षे चालणारी बॅटरी तयार केली आहे. या मिनी बॅटरीने मोठी क्रांती येणार आहे. ही बॅटरी बाजारात उतरल्यास, चार्जिंग झंझट छुमंतर होईल.
नवी दिल्ली | 2 February 2024 : चार्जर सोबत नसेल तर काय अवस्था होते, हे मोबाईल वापरणाऱ्यांना चांगले ठाऊक आहे. कारण बॅटरी फार वेळ फुल चार्ज नसते. बॅटरी उतरली की फोनचा वापर करता येत नाही. पण चीनमधील Betavolt या कंपनीने त्यावर एक तोडगा शोधला आहे. काही तास, महिने, वर्ष नाही तर 50 वर्षांपर्यंत चालणारी बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी न थकता कार्यरत राहिल. विशेष म्हणजे ही बॅटरीचा आकार पण फार मोठा नाही, तर अगदी छोटा आहे.
नाण्याएवढा आकार
चीनची कंपनी Betavolt ने तयार केलेली ही बॅटरी एखाद्या नाण्याऐवढी आहे. या बॅटरीवर प्रयोग सुरु आहे. कंपनी लवकरच बॅटरीत मोठा बदल करण्याची शक्यता आहे. ही बॅटरी बाजारात आल्यास मोठी क्रांती होईल. त्यामुळे मोबाईलचा आकार आणि चार्जरची गरज यावर मोठा परिणाम दिसेल.
बॅटरीचे वैशिष्ट्ये काय
- चीनच्या कंपनीने विकसीत केलेली या बॅटरीला ना तर चार्जिंगची गरज आहे ना तिला मेंटनेंस असेल. ही बॅटरी अणू ऊर्जेवर चालणार आहे. या बॅटरीचा वापर ड्रो आणि मोबाईलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये करण्यात येईल.
- या बॅटरीत एक नाही तर अनेक वैशिष्ट्ये आहेत. बॅटरीत नेहमी आग लागण्याच्या, स्फोटाच्या घटना घडतात. पण चीनच्या कंपनीने दावा केला आहे की, बॅटरीवर दबाव पडल्याने तिचा स्फोट होणार नाही अथवा या बॅटरीला आग लागणार नाही. ही बॅटरी बाजारात आणण्यापूर्वी तिच्यावर अनेक प्रयोग करण्यात आलेले आहेत. त्या आधारे हा दावा करण्यात येत आहे.
ही बॅटरी कसं करणार काम?
इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार, आयसोटोपमधील ऊर्जेचे विद्यूतमध्ये रुपांतर होईल. त्यासाठी एक विशिष्ट तंत्र वापरण्यात येणार आहे. पण त्यामुळे बॅटरी गरम होणार नाही अथवा इतर काही नुकसान होणार नाही. पण ही दमदार बॅटरी तयार करण्यासाठी मोठा खर्च आला आहे. त्यामुळे कदाचित ही बॅटरी महागडी असेल.
कुठे-कुठे होणार वापर ?
Betavolt कंपनीने तयार केलेली ही अणू ऊर्जेवरील बॅटरी अनेक सेक्टरसाठी, क्षेत्रांसाठी क्रांती घेऊन येणार आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात तर मोठी क्रांती येईल. या बॅटरीचा वापर एआय उपकरणे, एअरोस्पेस, हायटेक सेन्सर, आरोग्य क्षेत्रातील उपकरणे, मायक्रो प्रोसेसर, छोटे ड्रोन, मायक्रोरोबोट, मोबाईलमध्ये करता येईल.