‘या’ 7 सीटर SUV कारवर एक लाख रुपयांची सूट
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कारच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे कार निर्मात्या कंपन्याही ऑफ सीजनमध्ये आपल्या कारवर सूट देत आहेत. अशी परिस्थिती असतानाही एसयूव्ही सेगमेंट मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. कंपनीही एसयूव्ही गाडीवर सूट देत आहे. Ford Ecosport (45 हजारांची सूट) कंपनीने सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर शानदार अशी सूट दिली आहे. या एसयूव्हीची स्पर्धा विटारा, […]
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कारच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे कार निर्मात्या कंपन्याही ऑफ सीजनमध्ये आपल्या कारवर सूट देत आहेत. अशी परिस्थिती असतानाही एसयूव्ही सेगमेंट मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. कंपनीही एसयूव्ही गाडीवर सूट देत आहे.
Ford Ecosport (45 हजारांची सूट)
कंपनीने सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर शानदार अशी सूट दिली आहे. या एसयूव्हीची स्पर्धा विटारा, ब्रेजा, टाटा आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 सोबत होणार आहे. या सूटमध्ये 30 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. तसेच कॉर्पोरेट इंश्यूरन्स प्रीमियममध्ये डिस्काऊंटसह तीन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार आहे.
Mahindra TUV 300 (78 हजारांची सूट)
नुकतेच महिंद्राने कॉम्पॅक्ट एसयूव्ही TUV300 फेसलिफ्ट लाँच केली आहे. पण कंपनीने सूट केवळ जुन्या मॉडलवर दिली आहे. महिंद्रा या कारवर 63 हजार रुपयांची कॅशबॅक सूट देत आहे. ही सूट सर्व व्हेरिअंटवर मिळत आहे. ही कार 1.5 डीजल इंजनसोबत येते. तसेच 100 बीएचपी पॉवर जनरेट करते. यावर अतिरिक्त 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.
Honda BR-V (1 लाखांची सूट)
होंडा आपल्या क्रॉसओव्हर एसयूव्हीवर सर्वाधिक सूट देत आहे. कंपनी आपल्या 7 सीटर गाडीवर 1 लाख रुपयांची सूट देत आहे. यामध्ये 33 हजार रुपयांचा फ्री इंश्युरन्स आणि 50 हजार रुपयांचा एक्सचें[ज बोनस दिला जाणार आहे. तसेच नॉन एक्सचेंज बायर्सला 60 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत. यासोबतच 16 हजार रुपयांची एक्सेसरीजही मिळणार आहे.
Renault Captur 2019 ( 50 हजारांची सूट)
रेनोची कॅप्चर स्टायलीश क्रॉसओव्हर कारकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 50 हजार रुपयांची सूट दिली आहे. ही सूट एक्सचेंज बोनस म्हणून दिली जाणार आहे. या कारची टक्कर ह्युंडाई क्रेटा, निसान किक्स आमि होंडा BR-V सोबत होणार आहे.
Mahindra Scorpio (60 हजारांची सूट)
महिंद्राने स्कॉर्पियोवर 60 हजार रुपयांची सूट दिली आहे. स्कीममध्ये 30 हजार रुपयांची कॅश सूट आणि 25 हजार रुपयांची एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांची कॉर्पोरेटे सूट मिळणार आहे.
Safari (45 हजारांची सूट)
टाटा स्ट्रॉम सफारी ही टाटाची सर्वात जुनी एसयूव्हीमधील एक आहे. कंपनीने सफारी वर 45 हजार रुपयांची सूट दिली आहे. यामध्ये 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे आणि 25 हजार रुपयांचे इतर फायदे मिळणार आहेत.
Mahindra XUV500 2019 (75 हजारांची सूट)
पुढीलवर्षी महिंद्रा एक्सयूव्ही 500 चा नेक्स्ट जनरेशन अपडेट मॉडल लाँच होणार आहे. कंपनी यावर 75 हजार रुपयांची सूट देणार आहे. यामध्ये 36 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर असेल. 30 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 9 हजार रुपयांची कॉर्पोरेट ऑफर मिळणार आहे.
Tata Hexa (50 हजारांची सूट)
टाटा हेक्सा कंपनीचा फ्लॅगशिप मॉडल आहे. हेक्सावर 25 हजार रुपयेपर्यंतचा बोनस आणि 25 हजार रुपयांचे इतर फायदे मिळणार आहे.
Hyundai Tuscon (1 लाखांची सूट)
कंपनी आपल्या एसयूव्हीवर 1 लाख रुपयांची सूट देत आहे. कंपनी टुसोचा फेसलिफ्ट घेऊन येत आहे. टुसोची टक्कर कंपास, होंडा सीआरव्हीसोबत असेल. तसेच ह्युडांई लवकरच टुसोचा नवीन व्हर्जन लाँच करणार आहे.
Ford Endeavour Facelift launch-1 (50 हजारांची सूट)
फोर्डने यावर्षी अँडवेअरचा फेसलिफ्ट मॉडल लाँच केला आहे. कंपनीने यावर 50 हजार रुपयांची सूट दिली आहे. तसेच ही सूट ट्रान्समिशन व्हेरिअंटशिवाय ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्सिमिशन व्हेरिअंटवर मिळत आहे.