सॅम ऑल्टमन यांची घरवापसी! ओपनएआयमध्ये पुन्हा सीईओ पदी

Open AI Sam Altman | Open AI मधील नाट्यमय घडामोडी अजूनही सुरु आहे. पाच दिवसांपूर्वी ओपनएआयच्या संस्थापकापैकी एक सॅम ऑल्टमन यांना संचालक मंडळाने बाहेरचा रस्ता दाखवला. ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्याचा दावा सत्य नडेला यांनी केला आणि आता ऑल्टमन पुन्हा ओपनएआयच्या सीईओपदी विराजमान झाल्याची वार्ता येऊन धडकली आहे.

सॅम ऑल्टमन यांची घरवापसी! ओपनएआयमध्ये पुन्हा सीईओ पदी
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 4:25 PM

नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : अखेर OpenAI चं नाक दाबल्यानंतर, कंपनी नाक घासत माजी सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याकडे आली. सॅम ऑल्टमन यांना ओपनएआयने पाच दिवसांपूर्वी सीईओ पदावरुन हटवले होते. कंपनीचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी पण अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला यांनी या दोघांना कंपनीत विशेष प्रकल्पासाठी रुजू केल्याची घोषणा केली. तिकडे बडे गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांनी ओपनएआयच्या संचालक मंडळाला जेरीस आणले. त्यामुळे नाक मुठीत घेत संचालक मंडळाने आज सॅम ऑल्टमन यांना पुन्हा सन्मानानं सीईओपद बहाल केल्याची घोषणा केली. कंपनीने सॅम ऑल्टमन यांना काढल्यामुळे गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे मान्य केले. आता तरी या नाट्यमय वादावर पडदा पडेल, अशी आशा आहे.

आणि दिली आनंदवार्ता

हे सुद्धा वाचा

सॅम ऑल्टमन यांना सीईओपद बहाल करण्यासाठी याविषयीचे करारपत्र केल्याचे ओपनएआयने ट्विटरवर जाहीर केले. याविषयीची सविस्तर माहिती लवकरच समोर येईल, असे कंपनीने सांगितले. आतापर्यंत जी संयम बाळगला त्याबद्दल ओपनएआयने सर्वांचे आभार मानले.

ओपनएआयमध्ये परतण्याचे दिले संकेत

दरम्यान सॅम ऑल्टमन यांनी ओपनएआयमध्ये परतण्याचे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडल्याचे त्यांनी मान्य केले. ओपनएआयमधून बाहेर पडल्यावर मित्र सत्य नडेला यांनी मोलाची साथ दिली. आता पु्न्हा ओपनएआयमध्ये परतत असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी मायक्रोसॉफ्टसोबत काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संचालक मंडळाची माघार का

सॅम ऑल्टमन याला माघारी बोलवण्यासाठी बड्या गुंतवणूकदारांनी ओपनएआयवर दबाव टाकला. संचालक मंडळाला गुंतवणूकदारांचा रागरंग कळून चुकला होता. Thrive Capital आणि Tiger Global Management या बड्या गुंतवणूकदारांनी दबाव टाकला होता. तर कर्मचारी सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारी होते. मीरा मुराती यांना ऑल्टमन यांच्या जागी हंगामी सीईओपदी वर्णी लावण्यात आली होती. पण रविवारी त्यांना पण या पदावरुन बाजूला करण्यात आले होते. त्या ऑल्टमन यांच्या सहकारी होत्या.  त्यामुळे एकूणच ओपनएआयचा डोलारा कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे तातडीने संचालक मंडळाने गुडघे टेकवले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.