आजपर्यंतच्या सर्वात कमी किमतीत iPhone X घेण्याची संधी
नवी दिल्ली : जर तुम्ही नवा iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर iPhone X (64GB) सवलतीच्या दरात विकला जात आहे. या फोनची MRP 91,900 रुपये एवढी होती. सध्या फ्लिपकार्डवर याची सेलिंग प्राईस 66,499 रुपये दाखवली जात आहे. सवलतीनंतर हा फोन 64,999 रुपयांना मिळेल. iPhone X खरेदी करताना […]
नवी दिल्ली : जर तुम्ही नवा iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर iPhone X (64GB) सवलतीच्या दरात विकला जात आहे. या फोनची MRP 91,900 रुपये एवढी होती. सध्या फ्लिपकार्डवर याची सेलिंग प्राईस 66,499 रुपये दाखवली जात आहे. सवलतीनंतर हा फोन 64,999 रुपयांना मिळेल.
iPhone X खरेदी करताना पेमेंटसाठी HDFC बँकेचे कार्ड वापरल्यास 1,500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. या व्यतिरिक्त फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला या फोनची खरेदी करताना 50 कॉइन्स रिडीम करुन आणखी 2,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकतात. या सर्व लाभांसह iPhone X ची किंमत 62,999 रुपयांपर्यंत होईल. ही ऑफर फ्लिपकार्ट बिग शॉपिंग डेज सेल दरम्यान दिली जाणार आहे. सेलची शेवटची मुदत 19 मे असून ग्राहकांकडे आता केवळ 3 दिवस शिल्लक आहेत.
अॅपलने iPhone XR वर मर्यादित काळासाठी सवलतीची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनचा (64GB) स्टोरेज व्हेरियंट 59,990 रुपयांना सवलतीत दिला जात आहे. iPhone XR चे लॉन्चिंग ऑक्टोबरमध्ये झाले. त्यावेळी त्याची किंमत 76,900 रुपये होती. HDFC बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर हीच किंमत 53,400 रुपये होईल.
iPhone X चे स्पेसिफिकेशन्स
iPhone X मध्ये HDR सोबतच 5.8 इंच सुपर रेटिना (2436 x 1125 पिक्सल) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑल-ग्लास आणि स्टेनलेस स्टील डिझाईन देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनच्या रिअरमध्ये डुअल OIS सोबत 12-मेगापिक्सल ड्युअल कॅमरा, तर फ्रंटला सेल्फीसाठी 7 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यात पोट्रेट मोड आणि पोर्ट्रेट लायटिंग मोड हे फिचरही देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन A11 बायोनिक प्रोसेसरवर चालतो. टच आयडेंटिफिकेशनऐवजी फेस आयडेंटिफिकेशनचे फिचर उपलब्ध करण्यात आलेला iPhone X हा पहिला iPhone होता.