नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : आजचा शुक्रवार हा खरेदीदारांसाठी लकी ठरणार आहे. दिवाळी संपून अजून दहा दिवस उलटत नाही तोच पुन्हा खरेदीदारांसाठी Black Friday Sale ने धमाल उडवून दिली. टॉप ब्रँड्सने ग्राहकांचा दिवाळीचा आनंद कमी होऊ दिला नाही. या ब्रँडने अनेक तगड्या ऑफर्सचा भडीमार केला आहे. आज, 24 नोव्हेंबर 2023 रोजी भारतभर खरेदीची धूमच धूम उडाली आहे. त्यामागे कारण आहे ते टॉप ब्रँड्सच्या सवलतीचे. मेट्रो शहरातील रिटेलर्स, मॉल इतकेच नाही तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीदारांसाठी आकर्षक योजना, सवलतींचा पाऊस पडला आहे. तुम्हाला पण त्याचा फायदा घेता येईल.
नाताळापूर्वीच धमाका
आज 24 नोव्हेंबर आहे. पुढील 24 डिसेंबर रोजी नाताळ येईल. त्याची तयारी अनेक ब्रँड्सने आतापासूनच केली आहे. ॲमेझॉन, क्रोमा, नायका, एच अँड एम, मिंत्रा, प्युमा, आदिदास इत्यादी ब्रँड्सने त्यांच्या उत्पादनांवर भरघोस सूट दिली आहे. आज भारतातच नाही तर अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीयन देशांमध्ये पण ब्लॅक फ्रायडेची धमाल उडाली आहे. अनेक तगड्या ब्रँड्सनी सवलतींचा पाऊस पाडला आहे.
50-70% डिस्काऊंट
पश्चिमी देशात ब्लॅक फ्रायडेने खरेदीदारांची चंगळ केली आहे. तिकडे तर कुपन्स आणि इतर अनेक सवलतींचा पाऊस ग्राहकांना पडतो. एकतरी मंदीचे वारे वाहत आहे. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलत, सूट, आकर्षक योजना राबवून ग्राहकांना माफक किंमतीत वस्तूंची विक्री करत आहे. त्यातून त्यांचा मोठा साठा संपणार तर आहेच पण त्यासाठीचा लागणारा खर्चही वाचणार आहे. भारतात या कंपन्यांनी 50-70% डिस्काऊंट ठेवले आहे. यामध्ये सौंदर्य प्रसाधने, पुरुष, महिला, मुलांची कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर डिस्काऊंट देण्यात येत आहे.
क्रोमावर मोठी सवलत
इलेक्ट्रॉनिक ब्रँड Croma वर मोठी सूट देण्यात आली आहे. ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्ताने या वर्षात ग्राहकांची चंगळ होणार आहे. क्रोमाची ही ऑफर 24 ते 26 नोव्हेंबर अशी आहे. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सवलत मिळणार आहे. यामध्ये स्मार्टफोन, होम अप्लायन्सेस, गॅझेट आणि इतर वस्तूंवर ही सवलत मिळेल.
इतर अनेक ब्रँड्सवर भरघोष सूट