Fast Charging Mobile: 15 मिनिटात फुल चार्ज होणारा स्मार्टफोन बाजारात, यात 108MP कॅमेरा मिळेल
हल्ली लोकाना फास्ट चार्जिंग मोबाईल हवे आहेत. अनेक स्मार्टफोन युजर्स फार वेळ फोन स्वतःपासून लांब ठेवू शकत नाहीत किंवा फोन चार्ज करणं विसरतात. त्यामुळे बहुतांश लोकांना मोठी बॅटरी असणारे आणि फास्ट चार्ज होणारे स्मार्टफोन हवे असतात.
Fast Charging Mobile: हल्ली लोकाना फास्ट चार्जिंग मोबाईल हवे आहेत. अनेक स्मार्टफोन युजर्स फार वेळ फोन स्वतःपासून लांब ठेवू शकत नाहीत किंवा फोन चार्ज करणं विसरतात. त्यामुळे बहुतांश लोकांना मोठी बॅटरी असणारे आणि फास्ट चार्ज होणारे स्मार्टफोन हवे असतात. अशा लोकांसाठी ब्लॅक शार्क (Black Shark) नावाचा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये 120W चा चार्जर आहे आणि तो स्मार्टफोनची बॅटरी (long battery) अवघ्या 15 मिनिटांत 0-100 टक्के चार्ज करतो. ब्लॅक शार्कने चीनमध्ये ब्लॅक 5 गेमिंग स्मार्टफोन (Black 5 Gaming Smartphone) लॉन्च केला आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत CNY 2799 इतकी आहे. म्हणजेच भारतात या फोनसाठी 33,514 रुपये मोजावे लागतील. या स्मार्टफोनमध्ये युजर्सना 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज स्पेस मिळेल. तसेच, हा स्मार्टफोन ब्लॅक आणि डॉन व्हाइट या रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.
कंपनीने Black 5 Pro आणि Black Shark 5 असे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 2400 x 1080 पिक्सेल आहे. त्याचा रिफ्रेश रेट 144hz आहे. यामध्ये Samsung E4 AMOLED डिस्प्ले पॅनल वापरण्यात आलं आहे, जो 1300 nits पीक ब्राइटनेससह येतो.
ब्लॅक शार्क 5 प्रो मध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर
ब्लॅक शार्क 5 प्रो मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट वापरला आहे, जो 16 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजसह येतो. ब्लॅक शार्क 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे, जो 12 जीबी पर्यंत रॅमसह येतो. यात व्हीसी कुलिंग सिस्टम देण्यात आली आहे.
ब्लॅक शार्क 5 सिरीजचा कॅमेरा सेटअप
या फोनच्या प्रो वेरिएंटमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, तर ब्लॅक शार्क 5 मध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
ब्लॅक शार्क 5 ची बॅटरी आणि चार्जिंग
स्मार्टफोनमध्ये 4650 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याच्या मदतीने हा स्मार्टफोन 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.
ब्लॅक शार्क 5 ओएस
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये Android 12 OS आधारित Joy UI 13 इंटरफेस देण्यात आला आहे, जो गेमिंगसाठी उत्तम आहे. यात WiFi 6 आणि Bluetooth v 5.2 आहे.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स