WhatsApp वर पण अनोळखी कॉलचा भडीमार? हा आहे उपाय रामबाण
WhatsApp Silence Unknown Callers : व्हॉट्सॲपवर सुद्धा अनोळखी कॉलचे प्रचलन वाढले आहे. त्यामाध्यमातून ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार घडत आहे. या कॉलमुळे चिंताग्रस्त होऊ नका, त्यावर हे उपाय केल्यास तुम्हाला या अनोळखी कॉलचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
आजकाल प्रत्येकाकडे एक स्मार्टफोन असतोच असतो. त्यावर व्हॉट्सॲप इन्स्टॉल, इनबिल्ट असते. छोट्या छोट्या कामासाठी व्हॉट्सॲपचा वापर होतो. आता या ॲपद्वारे पेमेंटची पण सुविधा मिळाली आहे. पण या बहुउपयोगी ॲपला काही दुष्टांची नजर पण लागली आहे. व्हॉट्सॲपद्वारे काहीजण ब्लॅकमेलिंग करत असल्याचे उघड झाले आहे. थेट व्हिडिओ कॉल करुन, ऑडिओ कॉलच्या माध्यमातून असे प्रकार घडत आहे. तुमच्या स्मार्टफोनवर असे अनोळखी कॉल येत असतील सावध राहा आणि या उपयांनी या कॉलपासून दूर राहा.
फॉलो करा या स्टेप्स
- अनोळखी कॉलपासून सुटका करुन घेण्यासाठी व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जा
- त्यानंतर एक प्रायव्हसी हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
- आता कॉलच्या पर्यायावर जा. या ठिकाणी सायलेन्स अननोन कॉल्स हे फीचर दिसेल
- हे फीचर तुम्ही तात्काळ ऑफ करा. त्यामुले या अनोळखी कॉलपासून तुमची सूटका होईल.
हे सुद्धा वाचा
IP address असा लपवा
- तुमच्या व्हॉट्सॲपवर आयपी ॲड्रेस लपविण्यासाठी सर्वात अगोदर सेटिंगमध्ये जा
- यामध्ये प्रायव्हसी हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करा
- आता आयपी ॲड्रेस हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
- आता तुमच्या कॉल्सवर आयपी ॲड्रेस दिसणार नाही. आयपी ॲड्रेस लपविला जाईल
प्रायव्हसी चेकअपचा वापर
- प्रायव्हसी चेकअप फीचरचा वापर करुन तुम्ही सर्व प्रायव्हसी टूल्स मिळवू शकता. त्यासाठी व्हॉट्सॲप युझर्सने सेटिंग ओपन करावी. प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करावे. प्रायव्हसी मेन्यूमध्ये सर्वात वरती Start Checkup चा एक पर्याय वा बॅनर दिसेल. Start Checkup च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मल्टिपल प्रायव्हसी कंट्रोल पर्याय निवडा.
- यामुळे तुम्हाला तुमचे ओळखीचे क्रमांक निवडीचा पर्याय मिळेल. तसेच हे क्रमांक तुम्हाला तुमच्या यादीत दिसतील. या यादीत अननोन कॉल करणाऱ्यांना सायलंट करता येते. इतकेच नाही तर एक ब्लॉक कान्टॅक्ट यादी पण तयार करता येऊ शकते. हे पर्याय तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नसतील. तर तुमचे व्हॉट्सॲप एकदा अपडेट करुन घ्या.
Non Stop LIVE Update