मुंबईत सचिनच्या हस्ते BMW लाँच, किंमत तब्बल…
मुंबई : बीएमडब्ल्यू इंडियाने आज (16 मे) एक्स 5 मॉडल भारतात लाँच केले. बीएमडब्ल्यू इंडियाने भारतात एक्स 5 चे तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. भारतात बीएमडब्ल्यूच्या xDrive30d Sport ची किंमत 82.4 लाख रुपये आहे. नव्या बीएमडब्ल्यू एक्स 5 ला भारतामध्येच चेन्नई येथे असेंबल करण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या कारचे […]
मुंबई : बीएमडब्ल्यू इंडियाने आज (16 मे) एक्स 5 मॉडल भारतात लाँच केले. बीएमडब्ल्यू इंडियाने भारतात एक्स 5 चे तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. भारतात बीएमडब्ल्यूच्या xDrive30d Sport ची किंमत 82.4 लाख रुपये आहे. नव्या बीएमडब्ल्यू एक्स 5 ला भारतामध्येच चेन्नई येथे असेंबल करण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या कारचे लाँचिंग करण्यात आले.
बीएमडब्ल्यूच्या नवीन कारमध्ये पेट्रोल आणि डिझल असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या कारमध्ये रिस्टाईल्ड फ्रंट बंपर दिला आहे. यासोबत किडनी डिझाईन ग्रिल्स, नवी हेडलाईट्स आणि एसईडी डेटाईम रनिंग लाईट्स दिली आहे. रिअरमध्ये एलईडी टेल लाईट्स आणि रिस्टाईल्ड रिअर बंपर दिला आहे.
नवीन बीएमडब्ल्यू एक्स 5 CLAR प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. या कारचे डायमेंशन पाहिले तर, या कारची लांबी 36mm, रुंदी 66 mm, आणि उंची 19 mm आहे. तसेच व्हीलबेसही 42 mm वरुन वाढवून 2,975 mm केली आहे. यामुळे आता या कारमध्ये मोठी स्पेस मिळेल. या कारमध्ये 645 लीटरचा बूट स्पेस आहे आणि 1,860 लीटर्ससाठी वाढवला जाऊ शकतो.
इंजिन
कारचे इंजिन पाहिले तर, बीएमडब्ल्यू एक्स 5 मध्ये 3.0 लीटर टर्बो डीझल इंजिन आहे. जे 261 bhp पावर आणि 620 Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 8 ऑटोमेटिक गिअर दिले आहेत. फक्त 6.5 सेकंदात ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. कंपनी लवकरच पेट्रोल इंजिनही लाँच करणार आहे.
किंमत
xDrive30d Sport : 72.9 लाख
xDrive30d xLine आणि xDrive40i M Sport : 82.4 लाख