BMW ची तब्बल 22 लाखांची बाईक लाँच
नवी दिल्ली : BMW ने भारतीय बाजारपेठेत ‘BMW R 1250 GS’ आणि ‘R 1250 GS Adventure’ अशा दोन बाईक लाँच केल्या आहेत. या बाईकची किंमत अनुक्रमे 16.85 लाख आणि 21.95 लाख रुपये आहे. सध्या सर्वांचे लक्ष या महागड्या बाईककडे लागले आहे. या नवीन बाईकची बुकिंग कंपनीच्या डिरलशिपकडे केली जाऊ शकते. बुकिंग करण्याची किंमत पाच लाख रुपये […]
नवी दिल्ली : BMW ने भारतीय बाजारपेठेत ‘BMW R 1250 GS’ आणि ‘R 1250 GS Adventure’ अशा दोन बाईक लाँच केल्या आहेत. या बाईकची किंमत अनुक्रमे 16.85 लाख आणि 21.95 लाख रुपये आहे. सध्या सर्वांचे लक्ष या महागड्या बाईककडे लागले आहे. या नवीन बाईकची बुकिंग कंपनीच्या डिरलशिपकडे केली जाऊ शकते. बुकिंग करण्याची किंमत पाच लाख रुपये आहे.
BMW च्या या नवीन बाईकमध्ये सर्वात मोठा बदल हा इंजिनमध्ये करण्यात आला आहे. पहिल्या बाईकच्या तुलनेत ही बाईक जास्त पॉवरफुल आहे. त्यासोबतच अनेक नवीन फीचर दिले आहेत. नवीन बाईक्समध्ये 254 सीसी ट्विन-सिलिंडर, बॉक्सर इंजिन दिले आहे. हे इंजिन 7750 rpm वर 136hp ची पॉवर आणि 6250 rpm वर 143Nm टॉर्क जनरेट करते. जुन्या बाईकच्या तुलनेत नवीन बाईकमध्ये 11hp जास्त पॉवर आणि 18 Nm जास्त टॉर्क मिळणार आहे.
BMW च्या नवीन बाईकमध्ये नवीन एलईडी हेडलाईट आणि एलईडी डीआरएल दिली आहे. बाईकमध्ये 6.5 इंच टीएफटी स्क्रीन आहे. विशेष म्हणजे या बाईकमध्ये आपण स्मार्टफोनही कनेक्ट करु शकतो. या बाईकमध्ये ऑटोमॅटिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट कंट्रोल फीचर स्टँडर्ड दिले आहेत.
पाहा किंमत
BMW R 1250 GS च्या स्टँडर्ड व्हेरिऐंटची किंमत 16.85 लाख आणि प्रो व्हेरिऐंटची किंमत 20.5 लाख रुपये आहे. तर R 1250 GS Adventure ची स्टँडर्ड व्हेरिऐंट किंमत 18.25 लाख आणि प्रो व्हेरिऐंटची किंमत 21.95 लाख आहे.