घरगुती गॅस सिलिंडरवर 500 रुपयांची बचत होणार; अशा पद्धतीने करा बुकिंग
घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला गॅस सिलिंडर बुक करण्याची एक अशी आयडिया सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही 500 रुपयांपर्यंतची बचत करु शकता.
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे (COVID-19 Crisis) सामान्य नागरिकांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने लोकांचे उत्पन्न बंद होते, तर काहींची कमाई काही पटींनी कमी झाली आहे. याचदरम्यान, अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती मात्र वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती वाढवून ग्राहकांना अजून एक झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी नुकतीच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करुन ग्राहकांचा खिसा कापला आहे. मात्र आता एका अॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे. (Book LPG Cylinder from Paytm and get cashback up to Rs 500, follow these steps)
पेटीएम कंपनीने (Paytm) ही ऑफर सादर केली आहे. पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक (Book LPG Cylider by Paytm) केल्यास ग्राहकाला 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (LPG Cylinder booking paytm cashback) मिळणार आहे. विशेष म्हणजे हा कॅशबॅक पहिल्यांदाच पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक करणाऱ्यांना दिला जाणार आहे. यासाठी एका प्रोमोकोडची गरज लागणार आहे. हा कॅशबॅक मिळविण्यासाठी (ऑफर मिळवण्यासाठी) ग्राहकांना पेटीएमच्या प्रोमोकोड सेक्शनमध्ये जाऊन FIRSTLPG असा प्रोमोकोड लिहावा लागेल. यानंतर गॅस बुकिंग करताना 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. या प्रोमोकोडचा वापर एकदाच करता येऊ शकतो. ही ऑफर 31 डिसेंबर 2020 पर्यंतच आहे.
Paytm वरून सिलिंडर कसा बुक कराल?
1. पेटीएम अॅप ओपन करा 2. Recharge and Pay Bills सेक्शनवर क्लिक करा. त्यात Book Cylinder हा पर्याय निवडा. 3. त्यानंतर Bharat Gas, HP Gas किंवा Indane यापैकी तुमची गॅस प्रोव्हायडर कंपनी निवडा. 4. गॅस प्रोव्हायडर कंपनी निवडल्यानंतर गॅस एजन्सीमध्ये दिलेला रजिस्टर मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी टाका. ही माहिती दिल्यानंतर Proceed वर क्लिक करा. 5. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एलपीजी आयडी, कंन्ज्युमरचं नाव आणि एजन्सीचं नाव दिसेल. त्याखाली गॅस सिलेंडरसाठी द्यावी लागणारी रक्कम येईल. 6. Paytm Gas Booking Promocode चा FIRSTLPG हा प्रोमोकोड, सबंधित सेक्शनमध्ये टाका. याच प्रोमोकोडवर 500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ सुरुच
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार दिल्लीत 14.2 किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढवल्यानंतर ती 644 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 594 रुपये होती. मुंबईतही या सिलिंडरची किंमत 644 रुपये आहे. कोलकात्यात हीच किंमत 670.50 रुपये तर चेन्नईमध्ये 660 रुपये इतकी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (19 किलो) दरात नोव्हेंबर महिन्यात 119 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीत दुकानदारांना आता व्यावसायिक सिलिंडरसाठी तब्बल 1204 रुपये मोजावे लागत आहेत. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1085 रुपये होते. तर पाच किलोच्या सिलेंडरच्या किंमतीतही 264.50 रुपयांनी वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या
देशातील 1.7 कोटी दुकानदारांना Paytm चं गिफ्ट, वॉलेटद्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही
Paytm लघु उद्योजकांना 1000 कोटींचं कर्ज वाटणार, कोणत्याही गॅरंटीची गरज नाही
(buy cheap LPG gas Cylinders get RS 500 cashback on booking through Paytm)