हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका

Apple ने गेल्या वर्षी आयफोन 12 लाँच केला होता. कंपनीने म्हटले होते की, नवीन मॉडेलसोबत चार्जर आणि इयरबड्स मिळणार नाहीत.

हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला 'या' देशाचा जोरका झटका
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 4:13 PM

ब्राझीलिया : ब्राझील ग्राहक संरक्षण एजन्सी प्रोकॉन- एसपीने (Procon- SP) Apple कंपनीला 2 दशलक्ष (मिलियन) डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Apple कंपनीने आयफोन 12 च्या बॉक्ससोबत चार्जर न दिल्याने कंपनीला आता इतका मोठा दंड भरावा लागणार आहे. एका अहवालानुसार अ‍ॅपलला गेल्या वर्षीही या प्रकरणात प्रश्न विचारण्यात आला होता. प्रोकॉन-एसपीने याबाबत म्हटले आहे की, अ‍ॅपलने हा निर्णय घेताना पर्यावरणाचा फायदा होणार आहे, असं म्हटलं आहे. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतोय, हे सिद्ध होऊ शकलं नाही. (Brazil fines Apple $2 million for not including charger with iPhone 12 Box)

एजन्सीने आपल्या नवीन निर्णयात अ‍ॅपलला विचारले की, बॉक्समधून चार्जर काढून टाकल्यानंतर कंपनीने फोनची किंमत कमी केली का? अ‍ॅपलने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. चार्जरशिवाय अ‍ॅपल आयफोन 12 ची किंमत किती आहे आणि चार्जरसह किती आहे? याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती सादर केलेली नाही.

चार्जर व्यतिरिक्त अ‍ॅपलला असा सवाल केला की, युचर्सनी आयओएस अपडेट केले ज्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अ‍ॅपलनेही यात वापरकर्त्यांची कोणतीही मदत केली नाही. प्रोकॉन- एसपीचे कार्यकारी संचालक फर्नांडो कॅपेज म्हणाले की, अ‍ॅपलला हे माहीत असायला हवे की ब्राझीलमध्ये ग्राहक संरक्षणविषयक कठोर नियम आहेत. अशा परिस्थितीत कंपनीला त्यांचा आदर करावा लागेल.

अ‍ॅपलपाठोपाठ सॅमसंगनेही बॉक्समधून चार्जर वगळला

Apple ने गेल्या वर्षी आयफोन 12 लाँच केला होता. कंपनीने म्हटले होते की, नवीन मॉडेल चार्जरसह येणार नाही, तसेच बॉक्समध्ये तुम्हाला इयरबड्सही मिळणार नाहीत. Apple ने म्हटले होते की, यामागील प्रमुख कारण म्हणजे आम्हाला कचऱ्याच्या समस्येपासून पर्यावरण वाचवायचे आहे, कंपनीने अशा प्रकारचे पाऊल उचलल्यानंतर सॅमसंग आणि अन्य स्मार्टफोन ब्रँडनेही स्मार्टफोनच्या बॉक्समधून चार्जर वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यावरणाच्या नावाखाली पैसे कमावण्याची आयडिया?

या निर्णयानंतर अनेक क्रिटिक्सनी Apple कंपनीवर टीका केली आणि म्हणाले की, कंपनीने हे पाऊल पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नव्हे तर शिपिंग कॉस्ट कमी करण्यासाठी केले आहे. यात पर्यावरणाचा नव्हे तर केवळ आणि केवळ कंपनीचाच फायदा आहे.

संबंधित बातम्या

Samsung चा ग्राहकांना दणका, ‘या’ नव्या Smartphones सोबत Charger मिळणार नाही

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.