BSNL एकदम सुसाट, इंटरनेट आता सुपरफास्ट, ग्राहकांसाठी स्वस्त रिचार्ज, अपडेट तर जाणून घ्या
BSNL 12000 New 4G Towers to boost Internet : सरकारी दूरसंचार कंपनी BNSL ने अवघ्या काही दिवसातच मैदान मारले आहे. एअरटेल, जिओ, वोडाफोन-आयडियाच्या नाकात दम आणला आहे. आता कंपनीने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. स्वस्त रिचार्जसोबत सुसाट इंटरनेट ग्राहकांना मिळणार आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने ग्राहकांना नवीन वर्षात अजून एक सुखद धक्का दिला आहे. बीएसएनएलने मोठे बदल स्वीकारले आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या नाकात दम आणला आहे. BNSL ने अवघ्या काही दिवसातच मैदान मारले आहे. एअरटेल, जिओ, वोडाफोन-आयडियाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता केवळ स्वस्त रिचार्ज प्लॅनच नाही तर इंटरनेटची गती अजून वाढवण्यासाठी सरकारी कंपनीने मोठे पाऊल टाकले आहे. काय झाला आहे हा नवीन बदल? ग्राहकांना कसा होईल त्याचा फायदा?
BNNL ने 5G च नाही तर 6G च्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यापूर्वी 4G नेटवर्क अजून मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई या मोठ्या शहरांसह इतर मेट्रो शहरातच नाही तर ग्रामीण भागात 4जी सर्व्हिस अधिक मजबूत करण्यात येणार आहे. या सेवेचा विस्तार करण्यात आला आहे.
बीएसएनएल बसवणार 12,000 टॉवर
बीएसएनएलने देशात 12,000 नवीन 4जी टॉवर उभारले आहेत. देशातील 4 मेट्रो शहरांसह देशातील प्रमुख शहरे आणि आजूबाजूला हा नेटवर्क विस्तार करण्यात आला आहे. आता कंपनी जून 2025 पर्यंत देशातील प्रत्येक सर्कल, मंडळात 4जी सेवा सुरू करणार आहे. इतकेच नाही तर खासगी कंपन्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि स्पर्धेत उतरण्यासाठी ग्राहकांना स्वस्त 4जी प्लॅन देण्यात येणार आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंपनीची ही मोठी खेळी असेल.
BSNL चा नवीन वर्षात धमाका
वर्ष 2025 च्या सुरुवातीला संपूर्ण देशात 4G सेवा सुरू करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. जून महिन्यापर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी गतीने काम सुरू आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही या खात्याची कमान सांभाळल्यापासून बीएसएनएलमध्ये मोठे बदल दिसून आले आहेत. कंपनी याच वर्षात बहुप्रतिक्षेत असलेलेी 5G सेवा दणक्यात सुरू करणार आहे.
स्पॅम फ्री डेटा
बीएसएनएलने गेल्या वर्षात कात झटकली. अनेक मोठे बदल केले. या इंटरनेटच्या युगात ग्राहकांची फसवेगिरी टाळण्यासाठी स्पॅम फ्री डेटा उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने त्यांचा नेटवर्क विस्तार केला आहे. बीएसएनएलने ऑक्टोबर-डिसेंबर 2024 तिमाहीत अनेक नवीन सेवांचा प्रारंभ केला. यामध्ये स्पॅम फ्री नेटवर्क ही महत्त्वाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. स्पॅम फिल्टर करण्याचे काम करण्यात येईल.
फायबर बेस्ड टीव्ही सेवा
याशिवाय कंपनी आता फायबर बेस्ड टीव्ही सेवा देत आहे. यामध्ये ग्राहकांना केवळ इंटरनेटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तर या सेवेतंर्गत ग्राहकांना 500 हून अधिक जास्त टीव्ही चॅनल मोफत दिसतील. याशिवाय बीएसएनएलने सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हॉन्स कम्युटिंग (CDAC) सोबत करार करून खाणीतील सुरक्षिततेसाठी खास 5G कनेक्टिव्हिटी देण्याची योजना आखली आहे.