बीएसएनएलचा 56 रुपयांचा नवा प्लॅन, दररोज 1.5 जीबी डेटा
मुंबई : बीएसएनलने गेल्या काही दिवसात अनेक प्लॅन मागे घेतले आहेत. यासोबतच काही प्लॅनमध्ये बदल केले आहेत. कंपनीला बाजारात पुन्हा आपले स्थान टिकवण्यासाठी अनेक नव-नवीन प्लॅन लाँच करत आहे. कंपनीने नुकतेच आपल्या काही प्लॅनची व्हॅलिडिटी वाढवली आहे, तर काही प्लॅनमध्ये डेटा वाढवला आहे. यावेळी कंपनीने 56 रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. तसेच कंपनीने STV46 […]
मुंबई : बीएसएनलने गेल्या काही दिवसात अनेक प्लॅन मागे घेतले आहेत. यासोबतच काही प्लॅनमध्ये बदल केले आहेत. कंपनीला बाजारात पुन्हा आपले स्थान टिकवण्यासाठी अनेक नव-नवीन प्लॅन लाँच करत आहे. कंपनीने नुकतेच आपल्या काही प्लॅनची व्हॅलिडिटी वाढवली आहे, तर काही प्लॅनमध्ये डेटा वाढवला आहे. यावेळी कंपनीने 56 रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. तसेच कंपनीने STV46 प्लॅन बंद करणार असल्याची घोषणा केली.
नवीन प्लॅन येत्या 13 मे पासून ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीने आपल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5 जीबी डेटा आणि 14 दिवसांची व्हॅलिडिटी दिली आहे. तसेच या प्लॅनची सुविधा तामिळनाडू आणि चेन्नईमधील ग्राहाकांना मिळणार आहे.
बीएसएनएलने नुकतेच 47 आणि 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले होते. पहिले 47 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मुंबई आणि दिल्ली सोडून सर्वत्र अनलिमिटेड कॉलिंग दिली जात होती आणि व्हॅलिडिटी 11 दिवसांची होती. आता या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दिवसाला 1 जीबी डेटा आणि 9 दिवसांची व्हॅलिडिटी वाढवून दिली आहे.
बीएसएनलच्या 198 रुपयांच्या प्लानमध्येही पहिले दररोज 1.5 जीबी डेटा 28 दिवसांसाठी मिळत होता. आता या प्लॅनची व्हॅलिडिटी वाढवून 54 दिवसांची केली आहे आणि डेटाची लिमिट वाढवून 2 जीबी केली आहे.