मुंबई : तुम्ही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर सावध राहा. गुगल क्रोममध्ये एक बग सापडला (Bugs in google chrome) आहे. ज्यामुळे तुमच्या कम्प्युटर आणि मॅकवर त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हा बग तुमचे कम्प्युटर हॅक करु शकतो. त्यामुळे गुगलने तातडीने आपले गुगल क्रोममध्ये अपडेट (Bugs in google chrome) केले आहे.
गुगलने या बगपासून वाचण्यासाठी लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन लाँच केला आहे. गुगल क्रोमचा नवा स्टेबल व्हर्जन 80.0.3987.122 आहे. हा व्हर्जन विंडोज (windows), मॅक (MacOS) आणि Linux यूझर्ससाठी उपलब्ध आहे. हा क्रोम सर्वांनी वापरावा असेही गुगलकडून सांगितले जात आहे.
तुम्ही जर फ्री गुगल क्रोमचा वापर करत असाल तर लवकरच नवीन अपडेटेड गुगल इन्स्टॉल करा. गुगलने या बगला ट्रॅक केले असून यापासून सावध राहण्यासाठी युझर्सला धोका निर्माण होऊ नये म्हणून गुगल क्रोममध्ये अपडेट व्हर्जन लाँच केला.
क्रोम 80 मध्ये हाय लेव्हलचा बग मिळाला. त्यामुळे जावा स्क्रिप्ट हॅक होण्याची शक्यता आणि हॅकर्स कम्प्युटरमध्ये unrestricted रन करु शकतात, अशी माहिती मिळत आहे.
Linux किंवा macOS कसा अपडेट करायचा कम्प्युटर?