Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर, मोफत इंटरनेट आणि कॅशबॅकचाही फायदा
टेलीकॉम कंपनी Vodafone-Idea ने एक बंपर ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरनुसार रिचार्ज केल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला रिवॉर्ड दिले जाणार आहेत.
मुंबई : टेलीकॉम कंपनी Vodafone-Idea ने एक बंपर ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरनुसार रिचार्ज केल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला रिवॉर्ड दिले जाणार आहेत. रिलायन्स जिओ आणि दुसऱ्या टेलीकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी वोडाफोन आणि आयडियाकडून ही ऑफर आणल्याचे बोलले जात आहे. या ऑफरमुळे कंपनीला मोठा फायदा होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
Vodafone Reward प्रोग्रामनुसार ग्राहकांना प्रत्येक रिचार्जवर अतिरिक्त टॉकटाईम किंवा बोनस कार्ड दिले जाणार आहे. तसेच इतर अतिरिक्त फायदे देखील मिळणार आहेत. यात अनलिमिटेड कॉल्स, कॅशबॅक, कॉलर ट्यून, एक्स्ट्रा डाटा मिळू शकतो. विशेष म्हणजे या ऑफरसाठी रिचार्जची कमीतकमी मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही रिचार्जवर या ऑफरचा फायदा होऊ शकतो आणि ग्राहकांना इंटरनेट डाटा आणि कॉल्स फ्री मिळू शकतात.
टेलीकॉम टॉकने दिलेल्या माहितीनुसार या Reward Program चा फायदा घेण्यासाठी *999# डाईल करावे लागणार आहे. त्यानंतर ग्राहकांना रिवॉर्डविषयी माहिती मिळेल. या व्यतिरिक्त My Vodafone अॅपवर जाऊन रिवॉर्ड क्लेमही करता येणार आहे. मात्र यासाठी ग्राहकाला रिचार्ज केल्यानंतर 72 तासांच्या आत रिवॉर्डसाठी क्लेम करावा लागेल.
Airtel देखील अशाच प्रकारचा रिवॉर्ड प्रोग्राम आहे. AirtelThanks अंतर्गत एअरटेल ग्राहकांना ऑफर्स दिल्या जातात. येथे पण अनेक प्रकारचे फायदे देण्यात आले आहेत. रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर टेलीकॉम कंपन्यांनी काही काळासाठी अनेक ऑफर्स दिल्या. मात्र, नंतर यात कपात करण्यात आली. ग्राहक प्रीपेडला अधिक महत्त्व देत असल्याने जिओने काही काळानंतर पोस्टपेड प्लॅनमध्येही काही बदल केले.