जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक बंपर ऑफर

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा एक बंपर ऑफर आणली आहे. ही ऑफर 3 जूनपासून 14 जुलै 2019 पर्यंत असणार आहे.

जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक बंपर ऑफर
Follow us
| Updated on: Jun 12, 2019 | 7:11 PM

मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा एक बंपर ऑफर आणली आहे. ही ऑफर जिओच्या ग्राहकांना रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅकप्रमाणे फायदा देईल. ही ऑफर 3 जूनपासून 14 जुलै 2019 पर्यंत असणार आहे. याआधी जिओने क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

जिओने आपला फॅशन ब्रँड अजिओच्या (AJIO) भागिदारीसह ही ऑफर आणली आहे. 3 जूनपासून जिओच्या ग्राहकांना आपल्या रिचार्जवर 100 कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकचा उपयोग रिलायन्सच्या AJIO फॅशन ब्रँडच्या खरेदीसाठी होणार आहे.

या ऑफरचा लाभ 198 रुपये आणि 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल. जर तुम्ही 198 किंवा 399 रुपयांचा जिओ रिचार्ज केला, तर तुम्हाला कॅशबॅकच्या स्वरुपात 198 रुपये किंवा 399 रुपयांचे कूपन मिळेल. याचा उपयोग AJIO वर शॉपिंगमध्ये करता येईल. मात्र, यासाठी काही अटी देखील आहेत.

198 रुपयांचे कॅशबॅक कूपन वापरण्यासाठी तुम्हाला AJIO वर कमीतकमी 999 रुपयांची खरेदी करावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला 198 रुपयांच्या कॅशबॅकचा उपयोग करता येईल. म्हणजे 999 रुपयांची खरेदी केल्यानंतर तुम्हाला केवळ 801 रुपये द्यावे लागतील. 198 रुपये तुमच्या कॅशबॅक कुपनमधून घेतले जातील. याचप्रमाणे 399 रुपयांच्या कॅशबॅकचा उपयोग करण्यासाठी किमान 1,399 रुपयांची खरेदी करावी लागेल.

जिओच्या या ऑफरचा फायदा जून्या आणि नव्या अशा दोन्ही ग्राहकांसाठी असेल. जिओने अशी ऑफर पहिल्यांदा डिसेंबर 2018 मध्ये नववर्षांच्या ऑफरच्या स्वरुपात आणली होती. तेव्हाही AJIO सोबतच ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ही ऑफर केवळ 399 रुपये आणि त्यापुढील रिचार्जवर लागू होती.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.