मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे (COVID-19 Crisis) सामान्य नागरिकांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने लोकांचे उत्पन्न बंद होते, तर काहींची कमाई काही पटींनी कमी झाली आहे. याचदरम्यान, अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती मात्र वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती वाढवून ग्राहकांना अजून एक झटका दिली आहे. (buy cheap LPG gas Cylinders get RS 500 cashback on booking through Paytm)
सरकारी तेल कंपन्यांनी डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला गॅस सिलिंडर बुक करण्याची एक अशी आयडिया सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही 500 रुपयांपर्यंतची बचत करु शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार दिल्लीत 14.2 किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढवल्यानंतर ती 644 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 594 रुपये होती. मुंबईतही या सिलिंडरची किंमत 644 रुपये आहे. कोलकात्यात हीच किंमत 670.50 रुपये तर चेन्नईमध्ये 660 रुपये इतकी आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (19 किलो) दरात नोव्हेंबर महिन्यात 119 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीत दुकानदारांना आता व्यावसायिक सिलिंडरसाठी तब्बल 1204 रुपये मोजावे लागत आहेत. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1085 रुपये होते. तर पाच किलोच्या सिलेंडरच्या किंमतीतही 264.50 रुपयांनी वाढ झाली आहे.
कसे वाचवाल पैसे?
पेटीएमद्वारे (Paytm) एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) बुक केल्यास तुम्हाला 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. ही ऑफर 31 डिसेंबर 2020 पर्यंतच उपलब्ध आहे. इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅसचे (HP Gas) ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक करणाऱ्यांसाठी पहिल्यांदाच अशी ऑफर दिली जात आहे. परंतु ज्या ग्राहकांनी यापूर्वी पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक केला आहे, त्यांना ही ऑफर मिळणार नाही.
कॅशबॅक कसा मिळवाल?
सर्वप्रथम पेटीएम अॅप उघडा. त्यानंतर Recharge and Pay Bills वर क्लिक करा. त्यानंतर Book a Cylinder पर्यायावर क्लिक करा. बुक सिलिंडरवर क्लिक केल्यानंतर गॅस प्रोवायडर कंपनीची निवड करायची आहे. तिथे इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय असतील. गॅस प्रोवायडरची निवड केल्यानंतर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीमध्ये दिलेला मोबाईल नंबर अथवा एलपीजी आयडी टाईप करा. त्यानंतर Proceed वर क्लिक करा. तुमच्या समोर एलपीजी आयडी, कन्झ्युमरचं नाव आणि एजन्सीचं नाव दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं अकाऊंट दिसेल.
Paytm Gas Booking साठीचा FIRSTLPG हा प्रोमोकोड तिथे दिलेल्या प्रोमोकोड सेक्शनमध्ये टाईप करा. या प्रोमोकोडवर 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देण्यात आला आहे. दरम्यान ही ऑफर कोणताही ग्राहक केवळ एकदाच वापरू शकतो. तसेच कमीत कमी 500 रुपयांपर्यंतच्या बुकींवरच ही ऑफर मिळणार आहे.
संबंधित बातम्या
देशातील 1.7 कोटी दुकानदारांना Paytm चं गिफ्ट, वॉलेटद्वारे केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही
Paytm लघु उद्योजकांना 1000 कोटींचं कर्ज वाटणार, कोणत्याही गॅरंटीची गरज नाही
buy cheap LPG gas Cylinders get RS 500 cashback on booking through Paytm