नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळीत धनत्रयोदशीला सोने आणि चांदीचे शिक्के खरेदीचा अनेकांचा रतीब असतो. प्रत्येक वर्षी सोन्यात भर घालावी अशी मान्यता आहे. या दिवशी काही जण सराफा बाजारात जाऊन किडूमिडूक का असेना सोने खरेदी करतात. तुम्हाला सोने-चांदीची नाणी खरेदीसाठी आता सराफा बाजारात जाण्याची गरज उरली नाही. दिवाळीत अनेक कामांचा डोंगर डोक्यावर असताना बाहेर पडणे जमत नसेल तर घरबसल्या ही नाणी मिळवता येईल. काही ॲप ही सुविधा देत आहे. सोने-चांदीची नाणी तुम्हाला अशी ऑनलाईन खरेदी करता येतील.
15 मिनिटांत घरपोच नाणी
काही Apps काही शहरांमध्ये ही सुविधा देत आहे. तुम्ही ऑनलाईन सोने-चांदीच्या नाण्याची खरेदी केली तर अवघ्या 15 मिनिटांत ही नाणी घरपोच मिळतील. आता अनेक ॲप्सच्या माध्यमातून घरपोच किराणा पोहचतो. अनेक सामान डिलिव्हरी होते. तसेच Gold Coin वा Silver Coin घरपोच मिळेल. खरेदीपूर्वी तुमच्या शहरात त्याची डिलिव्हरी होते का ते एकदा तपासून घ्या. खात्री झाली आणि किंमत योग्य वाटली तर ऑर्डर बुक करा.