नवी दिल्लीः सध्या सर्वत्र उष्णतेची लाट (Heat wave) निर्माण झाली असून येत्या काही दिवसांमध्ये ती अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा कधीच चाळीशी पार गेला आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 45 अंशाच्या जवळ पोहचले आहे. तापमान वाढल्याने साहजिकच गर्मी अधिक होत आहे. रात्रीच्या वेळी पंखे, कुलरदेखील निरुपयोगी (Useless) ठरत आहेत. अशात अनेक नागरिक एसीचा (AC) पर्याय शोधत आहेत. परंतु अनेक एसी हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत, त्यामुळे एसी खरेदी करणेही सर्वसामान्यांना परवडत नाही. अशात आज आम्ही अगदी 30 हजारांपेक्षाही कमी किमतीमधील दीड टनांचे एसींची माहिती घेउन आलो आहोत.
ब्ल्यू स्टार विंडो एसी सहज पध्दतीने इंस्टॉल करता येतो. हा एसी 3 स्टार रेटिंग आणि बॅटर कुलिंग टेक्नोलॉजीसोबत उपलब्ध आहे. याचा मेंटेनेंसही कमी आहे. हा एक स्पेशल अँटीबॅक्टेरिअल कोटींगसह उपलब्ध आहे. हा एसी दीड टनाचा असून त्याची किंमत 28 हजार 490 रुपये इतकी आहे.
हिताचीचा 1.5 टनाचा 3 स्टार विंडो एसी मीडिअम रुमसाठी अगदी परफेक्ट आहे. यातून अतिशय उत्तम कुलिंग होते. याचा मेंटेनेंसही अगदी कमी आहे. वीजेच्या कमी वापरासाठी हा एसी चांगला पर्याय आहे. याची किंमत 28 हजार 999 इतकी आहे.
वोल्टास कंपनीचा दीड टना 3 स्टार विंडो एसी अँटीबॅक्टेरिअल फिल्टर, डस्ट फिल्टर आणि डि-ह्युमिडिफायरसह उपलब्ध आहे. मीडियम साइजच्या रुमसाठी हा एक चांगला पर्याय आहे. याची किंमत 27 हजार 499 इतकी आहे.
मार्कचा दीड टनाचा स्प्लिट एसी 3 स्टार रेटिंगसह उपलब्ध आहे. यातून चांगली कुलिंग होते. याशिवाय विजेच्या कमी वापरासाठी हा एसी उत्तम आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध या एसची किंमत 27 हजार 490 रुपये आहे.
सॅनसुई कंपनीचा दीड टनांचा स्प्लिट एसीलाही 3 स्टार रेटींग मिळाले आहेत. चांगल्या कुलिंग फिचर्ससह हा एसी बाजारात उपलब्ध आहे. यातून वीजेची चांगली बचत होते. स्लीपिंग मोड आणि इको मोड देण्यात आलेले आहेत. यासह टर्बो मोडसोबत डस्ट फिल्टर आणि अँटीबॅक्टेरिअल फिल्टर देण्यात आले आहे. याची किंमत 28 हजार 990 रुपये इतकी आहे.