Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इएमआयवर स्मार्टफोन घेणे सापळा की सुविधा? असा निवडा योग्य पर्याय

आता बहुतेक ई-कॉमर्स साइट्स आणि किरकोळ स्टोअर्स मासिक इएमआय पर्यायासह फोन प्रदान करतात. तुम्ही इएमआवर स्मार्टफोन (Smartphone on EMI) आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट सहज खरेदी करू शकता. आता प्रश्न पडतो की तुम्ही फोन इएमआयवर घ्यावा की नाही. ईएमआयवर कोणतेही उत्पादन खरेदी केल्याने त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.

इएमआयवर स्मार्टफोन घेणे सापळा की सुविधा? असा निवडा योग्य पर्याय
इएमआयवर खरेदीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 2:10 PM

मुंबई : आजच्या काळात, जर तुम्हाला एखादा महागडा स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट कमी असेल, तर तुम्ही एकाच वेळी पूर्ण रक्कम भरण्याऐवजी मासिक हप्त्याद्वारे म्हणजेच इएमआयवर खरेदी करू शकता. आता बहुतेक ई-कॉमर्स साइट्स आणि किरकोळ स्टोअर्स मासिक इएमआय पर्यायासह फोन प्रदान करतात. तुम्ही इएमआवर स्मार्टफोन (Smartphone on EMI) आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट सहज खरेदी करू शकता. या प्लॅटफॉर्मवरून, तुम्ही अनेक बँकांमधून फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू 3 ते 36 महिन्यांपर्यंतच्या इएमआय वर मिळवू शकता. या ऑफर डेबिट आणि क्रेडिट कार्डसह इतर पद्धतींद्वारे मिळू शकतात. तथापि, बहुतेक बँका 12 ते 18 टक्के वार्षिक व्याजदराने EMI ऑफर करतात.

इएमआय म्हणजे काय?

ईएमआय प्रणाली अशा प्रकारे समजून घ्यावी लागेल. जसे की तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर आयफोन 12 खरेदी करत आहात. तुम्ही त्याचा 64GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 38,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही 13 टक्के दराने 3 महिन्यांचा इएमआय प्लॅन निवडल्यास, तुम्हाला दरमहा 13,283 रुपये द्यावे लागतील.

अशा प्रकारे तुम्हाला या आयफोनसाठी 39,849 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 850 रुपये जास्त द्यावे लागतील. तर, जर तुम्ही 15 टक्के दराने 36 महिन्यांचा ईएमआय प्लॅन निवडला तर तुम्हाला दरमहा 1352 रुपये खर्च करावे लागतील. या फोनसाठी तुम्हाला एकूण 48,672 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच तुम्ही 38,999 रुपयांच्या फोनसाठी 9,673 रुपये अधिक खर्च केले आहेत.

हे सुद्धा वाचा

आता प्रश्न पडतो की तुम्ही फोन इएमआयवर घ्यावा की नाही. ईएमआयवर कोणतेही उत्पादन खरेदी केल्याने त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. अनेक वेळा, वापरकर्त्यांना विक्रीदरम्यान नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळतो, जो एक चांगला पर्याय आहे. त्याच वेळी, स्मार्टफोन हे असे उत्पादन आहे जे कमी व्याजदराने खरेदी करण्याचा योग्य पर्याय आहे, करण फोनचे मूल्यांकन कालांतराने कमी होईल, म्हणून तो जास्त व्याज दरांवर खरेदी करणे हा चांगला पर्याय नाही. याशिवाय, परतफेडीमध्ये चूक झाल्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही मोठा परिणाम होतो. तुमच्या बजेटनुसार फोन निवडणे योग्य ठरेल.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.